‘मुख्य प्रवाहात आणून ते सोडत असतील तर दुर्दैव’; आमश्या पाडवींच्या प्रवेशावर राऊतांची टीका
Sanjay Raut On Amshya Padvi : ज्यांना मुख्य प्रवाहात आणलं जात ते सोडून जात असतील दुर्देव असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे
विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी (Amshya Padvi) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन निवडणुक काळातच आमश्या पाडवी यांनी ठाकरेंची साथ सोडल्याने ठाकरे गटाच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. पाडवी यांच्या प्रवेशावर बोलताना संजय राऊत यांनीही टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंचे आदेश, दोघंही तातडीने मुंबईला या! खैरे-दानवेंचा वाद मिटणार की वाढणार?
संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंनी तळागाळातल्या, आदिवासी आणि इतर कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. उद्धव ठाकरे यांनी कोणाला आमदार तर कोणाला खासदार केलं. तसेच कधी महामंडळेही दिली आहेत. मला आमश्या पाडवी यांच्याबद्दल अधिक माहिती नाही, त्यांचा काय निर्णय आहे पण हे सगळे सोडून चालले आहेत हे दुर्देव असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.
State Assembly Election 2024 : लोकसभेपाठोपाठ ‘त्या’ चार राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर, मतदान कधी?
विधानपरषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी आज त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. आपण ठाकरे गट सोडून कुठेच जाणार नाही असे आदल्या दिवसापर्यंत सांगणाऱ्या आमदार पाडवी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
‘लोकसभेसाठी इच्छुक पण, ठाकरे गटातच राहणार’; नाराजीच्या चर्चांना दानवेंचा फुलस्टॉप!
नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा म्हणून आमदार पाडवी ओळखले जातात. शिवसेनेत फूट पडली तेव्हा आमदार पाडवी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता. नंदूरबार जिल्ह्यातील ठाकरेंचे विश्वासू शिलेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. 1995 मध्ये त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती. आज आमदार पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासह काही नगरसेवकांनीही प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने नंदूरबार जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. यावेळी घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा हा मुख्यमंत्री नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लगावला.