State Assembly Election 2024 : लोकसभेपाठोपाठ ‘त्या’ चार राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर, मतदान कधी?

State Assembly Election 2024 : लोकसभेपाठोपाठ ‘त्या’ चार राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर, मतदान कधी?

State Assembly Election 2024 : देशात लोकसभा 2024 च्या (Lok Sabha Election 2024)निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यासोबतच देशात 4 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Election 2024)तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेश(Andhra Pradesh), अरुणाचल प्रदेश(Arunachal Pradesh), सिक्कीम(Sikkim ), ओडिशा(Odisha) या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

‘फक्त मोबाइलवर फोटो पाठवा, 100 मिनिटांत गैरप्रकारांचा बंदोबस्त करू’; निवडणूक आयुक्तांचा शब्द

निवडणूक आयोगाने आज शनिवारी लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. दरम्यान आंध्र प्रदेशमध्ये 18 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. 13 मे रोजी मतदान होणार आहे. अरुणाचल 20 मार्च अधिसूचना, 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

सांगलीच्या बदल्यात ठाकरेंना ‘जालना’ मिळाला : जागा देतानाच राहुल गांधींनी उमेदवारही दिला!

त्याचबरोबर सिक्कीममध्ये 19 मार्चची अधिसूचना, 20 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ओडिशामध्ये दोन टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्याची अधिसूचना 29 एप्रिलला तर दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना 7 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. तसेच 25 मे आणि 1 जूनला मतदान होणार आहे.

ओडिशातील 147, सिक्कीममधील 32, अरुणाचल प्रदेशातील 60 आणि आंध्र प्रदेशमधील 175 विधानसभा जागांवर निवडणूक होणार आहे. ओडिशात बिजू जनता दल (बीजेडी) सत्तेत आहे. येथे त्यांची भाजपची थेट लढत होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज