दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, नेव्हल डॉकयार्ड स्कूलमध्ये 301 रिक्त जागांसाठी भरती सुरू

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, नेव्हल डॉकयार्ड स्कूलमध्ये 301 रिक्त जागांसाठी भरती सुरू

Naval Dockyard Mumbai Bharti 2024 : नोकरीच्या (Job) शोधात असलेल्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र सरकारची (Central government) नोकरी मिळण्याची संधी चालून आली आहे. ती म्हणजे, संरक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Defence) (नेव्ही) अंतर्गत नेव्हल डॉकयार्ड स्कूल (Naval Dockyard School) , मुंबई येथे भरती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. ही भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदभरीसाठी भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दरम्यान, याच भरती प्रक्रियेविषयी जाणू घेऊ.

‘फक्त मोबाइलवर फोटो पाठवा, 100 मिनिटांत गैरप्रकारांचा बंदोबस्त करू’; निवडणूक आयुक्तांचा शब्द 

सरकारी नोकरी मिळण्यासाठी आज अनेक जण प्रयत्न करत आहे. मात्र, सरकारी नोकरी मिळत नसेल तर या भरतीसाठी तुम्ही रितसर अर्ज करू शकता. उमेदवार Indiannavy.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑनलाइन भरू शकतात. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १६ मार्चपासून सुरू होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ५ एप्रिल आहे.

सांगलीच्या बदल्यात ठाकरेंना ‘जालना’ मिळाला : जागा देतानाच राहुल गांधींनी उमेदवारही दिला!

रिक्त जागा आणि पदांची संख्या
नेव्हल डॉकयार्ड, मुंबई यांनी सुरू केलेली भरती ही शिकाऊ उमदेवारांसाठी पार पडत आहे. या भरतीअतंर्गत फिटर/इलेक्ट्रीशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/डिझेल मेकॅनिक/प्लंबर/पेंटर आणि इतर ट्रेड्सच्या 301 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता
सर्व पदे – (i) 50% गुणांसह 8वी, 10वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज सुरू होण्याचाी तारीख – 16 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 एप्रिल 2024

अधिकृत वेसबाईट – Indiannavy.nic.in

या पद भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पध्दतीने आपला अर्ज करावा लागेल. इतर कोणत्याही माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच अर्ज सादर करावा. उशीरा आलेले अर्ज नाकारले जातील, याची उमदेवराांनी नोंद घ्यावी. तसंच अर्जात काही त्रुटी असल्यास अर्ज बाद केल्या जाईल. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी आणि प्रवेशपत्र नेव्हल डॉकयार्डला पाठवण्याची आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज