दारु घोटाळा प्रकरण : दिल्लीचे CM अरविंद केजरीवालांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स

दारु घोटाळा प्रकरण : दिल्लीचे CM अरविंद केजरीवालांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स

दारु घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांना पुन्हा ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. ईडीने केजरीवाल यांना पाचव्यांदा चौकशीसाठी बोलावलं आहे. याआधीही दारु घोटाळ्याप्रकरणी ईडीने केजरीवालांना चौकशीसाठी बोलावलं होतं. समन्स बजावण्याची कारवाई सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

“मनोज जरांगे अन् आरक्षणाच्या वादापासून चार हात लांबच रहा” : अजितदादांच्या आमदार अन् मंत्र्यांना सूचना

दिल्लीत दारु घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 17 जानेवारी, 3 जानेवारी, 21 डिसेंबर, आणि 2 नोव्हेंबर रोजीही समन्स बजावण्यात आले होते. मात्र, अरविंद केजरीवाल ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत. अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठीच ही कारवाई केली जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून केला जात होते. सत्ताधारी भाजप चौकशीसाठी बोलावून अटक करत असल्याचं आम आदमी पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं. चौकशी करायची असेल तर प्रश्न लिहुन केजरीवालांकडे देऊ शकतात, असं आपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

Budget 2024 : ‘विरोधकांना पश्चातापाची संधी, आत्मपरिक्षण करा’; बजेटआधी PM मोदींकडून कानउघाडणी

ईडीला पाठवलेल्या पत्रात केजरीवाल यांनी म्हटले की, प्रत्येक कायदेशीर समन्स स्वीकारण्यास तयार आहे, परंतु हे ईडी समन्स देखील पूर्वीच्या समन्सप्रमाणेच बेकायदेशीर आहे. हे समन्स राजकीय हेतूने प्रेरित असून समन्स मागे घेण्याची मागणी केजरीवालांकडून करण्यात आली होती. तसेच मी माझे आयुष्य प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने जगले. माझ्याकडे लपवण्यासारखे काही नसल्याचं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे.

सुषमा अंधारे महाराष्ट्र पिंजून काढणार! 800 किलोमीटरच्या ‘मातृतीर्थ ते शिवतीर्थ’ यात्रेची सुरुवात

सिसोदिया आणि संजय सिंह तुरुंगात :
दारु घोटाळ्याप्रकरणी मनिष सिसोदिया आणि संजय सिंह तुरुंगात आहेत. आता या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवून आरोपी करण्याची तयारी आहे. मागील वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आम आदमी पक्षाचे आणखी एक नेते संजय सिंह यांना अटक करण्यात आली होती. याशिवाय आप नेते विजय नायर यांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज