मद्य धोरणप्रकरणी केसीआरची मुलगी कविता अडचणीत; ईडीकडून चौकशी होणार

मद्य धोरणप्रकरणी केसीआरची मुलगी कविता अडचणीत; ईडीकडून चौकशी होणार

नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळा (Delhi Liquor Scam)प्रकरणी आपचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) तिहार तुरुंगात आहेत. आता या घोटाळ्यात ईडीनं तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांची मुलगी आणि विधान परिषद सदस्य के कविताला (K Kavita) समन्स पाठवलंय. ईडीनं(ED) 9 मार्चला कविताला चौकशीसाठी बोलावलंय. दिल्लीचे माजी मंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयनं (CBI) मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती.

कविता या दक्षिण गटाच्या प्रतिनिधींपैकी एक आहे, ज्यांच्यावर आपच्या नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे, त्यांच्यापैकी कविता एक आहेत. मंगळवारी अटक केलेल्या हैदराबाद येथील व्यापारी अरुण पिल्लई सोबतच कविताचीही चौकशी होणार आहे.

Swara Bhaskar च्या वेडिंग पार्टी कार्डवर इन्कलाब जिंदाबादचा स्लोगन ‘हे’ आहे कारण…

या दक्षिण गटाचं प्रतिनिधित्व अभिषेक बोईनापल्ली, अरुण पिल्लई आणि बुची बाबू यांनी केलं होतं. बोयनापल्ली यांनी नायर आणि त्याचा सहकारी दिनेश अरोरा यांच्याशी संगनमतानं आणि कट रचून 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे.

दिल्लीचे माजी मंत्री मनीष सिसोदियांची चौकशी करण्यात आली. त्याचवेळी केंद्रीय तपास यंत्रणांकडून आपच्या नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच दिल्याबद्दलही चौकशी केली. सध्या मनीष सिसोदिया तिहार जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.

सीबीआयनं तब्बल आठ तास चौकशी केल्यानंतर सिसोदियांना अटक करण्यात आली. सिसोदियांना पहिल्यांदा सीबीआय कोठडीत पाठवलं होतं, त्यानंतर आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

20 मार्चपर्यंत सिसोदिया न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत. मद्य धोरण घोटाळ्यावरुन भाजपकडून सातत्यानं आम आदमी पक्षावर निषाणा साधलाय. भाजपच्या नेत्यांकडून मद्य धोरणाच्या मुद्द्यावरुन ‘आप’वर जोरदार टीका केली जातेय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube