‘इंडिया आघाडीच्या इंजिनमध्ये फक्त चालकच बसू शकतो’; फडणवीसांची जहरी टीका
Devendra Fadnvis On India Alliance : इंडिया आघाडीच्या (India Alliance) इंजिनमध्ये फक्त चालकच बसू शकतो, पण विकासपुरुष मोदींच्या इंजिनला विकासाची बोगी असल्याची जहरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केली आहे. दरम्यान, वर्धा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.
अटकेच्या भीतीपोटी फडणवीसांनी पक्ष फोडले; राऊतांनी दावा ठोकत वातावरण तापवलं
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंजिनला विकासाची बोगी आहे पण इंडिया आघाडीतील सर्वच घटक पक्षाच्या नेत्यांच्या इंजिनमध्ये फक्त चालकच बसू शकतो, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राहुल गांधींपासून ते शरद पवार, ममता बॅनर्जी, उदनिधी स्टॅलिन, उद्धव ठाकरे हे सगळेच म्हणतात की आम्ही इंजिन आहोत, पण त्यांच्या इंजिनला डबा नाहीये, विरोधकांच्या डब्यात बसायला सर्वसामान्य नागरिकांना जागाच नाही, त्यांच्या इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हरच बसू शकतो, म्हणजेच शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरे, स्टॅलिनच्या इंजिनमध्ये उदयनिधीला जागा असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी घराणेशाहीवरुन टीका केली आहे.
सुप्रिया सुळेंविरोधात वेगळीच राजकीय खेळी? ‘तुतारी’ नावाचे चिन्ह घेऊन अपक्ष उमेदवार रिंगणात
तसेच आता विरोधकांचं इंजिन ठप्प पडलेलं आहे. त्यामुळेच आता देशात एकच पर्याय आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हा. विकासपुरुष नरेंद्र मोदी यांच्या इंजिनला वर्धा मतदारसंघाची बोगी लावली की विकास होणार असल्याचा शब्दच फडणवीस यांनी वर्धाकरांना दिला आहे.
भावांतर योजनेची रक्कम आचारसंहितेनंतर जमा होणार
अवकाळीसह इतर कारणामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने भावांतर योजना सुरु केली आहे. याआधीही आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट सहा हजार रुपये जमा केलेले आहेत. नूकसानग्रस्त कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आचारसंहिता संपल्यानंतर भावांतर योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकणार असल्याचं आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिलं आहे.