उपराष्ट्रपती पदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंबा नाही, शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट

Sharad Pawar On C. P. Radhakrishnan : ससंदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याने 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएकडून (NDA) महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) तर इंडिया आघाडीकडून (India Aghadi) सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी (Sudarshan Reddy) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
एनडीएकडे लोकसभेत आणि राज्यसभेत बहुमत असल्याने सी. पी. राधाकृष्ण यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. मात्र ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून (BJP) प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना फोन करत सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावे असं आहवान केले आहे. मात्र सी. पी. राधाकृष्ण यांना पाठिंबा देणार नसल्याची भूमिका शरद पवार यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीनंतर शरद पवार माध्यमांशी बोलत होते.
यावेळी शरद पवार म्हणाले की, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता. त्यांनी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती केली. पण मी त्यांना सांगितलं ते आमच्या विचारांचे नाहीत. आम्ही पाठिंबा देणार नाही. राधाकृष्णन राज्यपाल असताना त्यांच्या समोर झारखंडचे सीएम सोरेन यांना अटक झाली होती असं शरद पवार म्हणाले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आम्ही काल उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी बी सुदर्शन यांचा फॉर्म भरला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आमची मते कमी आहे. पण आम्हाला मत कमी असल तरी आम्हाला चिंता नाही. आमची मते कमी असले तरी आम्ही नसते उद्योग करणार नाही. तीनशे खासदार रस्त्यावर उतरले तिथे आम्हाला अटक झाली असं देखील शरद पवार म्हणाले.
तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी निवडणूक आयोग स्पष्ट भूमिका घेत नसल्याचा आरोप केला आहे. शरद पवार म्हणाले की, निवडणूक आयोग स्पष्ट भूमिका घेत नाही. निवडणूक आयोग स्पष्ट भूमिका घेत नाही. मतदार यादीबाबत आमचा अभ्यास सुरू आहे. असं देखील यावेळी शरद पवार म्हणाले.
तसेच आगामी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी बाजी मारणार असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. बिहार राजकीय दृष्टीने जागृत राज्य आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या यात्रेला बिहारमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. असेही यावेळी शरद पवार म्हणाले. लोकसभेत शरद पवार यांचे 8 तर राज्यसभेत 2 खासदार आहे.