शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या हातून जाणार; वकील असिम सरोदे यांनी केला मोठा दावा

न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे. त्यावर वकील असीम सरोदे बोलले.

शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या हातून जाणार; वकील असिम सरोदे यांनी केला मोठा दावा

Asim Sarode on Eknath Shinde : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे (Shinde) यांना मिळालं. मात्र, या संदर्भातील वाद सर्वोच्च न्यायालयांमध्ये अजूनही प्रलंबित आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून हा वाद संपवण्याचे सुतोवाच मागील महिन्यामध्ये करण्यात आले असून 15 सप्टेंबरनंतर तारीख निश्चित होऊन शिवसेना नाव, पक्ष आणि झेंड्याच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे. हा निर्णय कोणाच्या बाजूने जाईल याची चर्चा होत असतानाच आता वकील असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे.

मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार; शिवसेना नेते संजय राऊतांचं थेट मुख्यमंत्र्यांना चॅलेंज

सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द येत्या महिनाभरात संपवतील. कुणीही, कसेही, मनमानेल त्या पद्धतीने पक्ष फोडतील, पक्ष पळवतील ही असंविधानिकता आणि पक्षचोरी चालणार नाही असे प्रस्थापित होणे कायद्यावर आणि न्यायव्यस्थेवर प्रेम करणारा म्हणून मला महत्वाचे वाटते. असंविधानिक प्रक्रियेतून सरकार प्रस्थापित करण्यात राज्यपाल पदावरील व्यक्तीने सक्रिय सहभागी घेणे , केंद्रीय निवडणूक आयोगाने कायदाबाहय वागणे आणि विधानसभा अध्यक्षांनी कधीच तटस्थ न वागता बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी काम करणे याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार ते सुद्धा मला बघायचे आहे असंही ते म्हणालेत.

न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे. त्यामुळे सूर्यकांत घटनापीठाचे सदस्य असल्याने शिवसेना सुनावणी लांबणीवर पडली आहे. घटनापीठाची सुनावणी 19 ऑगस्टपासून ते 10 सप्टेंबरपर्यंत होणार असल्याने शिवसेना प्रकरणावर कोणताही निर्णय घेण्याची शक्यता कमी असून त्यानंतर निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेना चिन्ह आणि नावाच्या वादावर 15 सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. कदाचित 15 सप्टेंबरनंतर अंतिम तारीख निश्चित होऊन किंवा ऑक्टोबरमध्येच हे प्रकरण खंडपीठासमोर येण्याची शक्यता आहे.

follow us