विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपताच दानवे मवाळ?, दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबद्दल काय म्हणाले?

विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपताच दानवे मवाळ?, दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबद्दल काय म्हणाले?

Ambadas Danve on Shiv Sena party split : एकाच शिवसेनेच्या सध्या दोन शिवसेना झालेल्या आहेत. त्यावरून वारंवार राज्यात वातावरण तापत असतं. दरम्यान, शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आज यावर उघड भाष्य केल आहे. (Danve) शिवसेनेसारखी मजुबत संघटना फोडण्यात आली, याची सल मनाला कायम आहे. या महाराष्ट्रात दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आहे.

दानवे पुढे म्हणाले, आपली ताकद आणि सत्ता या राज्यात असली पाहिजे, असं एक शिवसैनिक म्हणून मला वाटतं. या विषयावर भाष्य करावं एवढा मोठा मी नाही. पण संघटना फुटल्याची सल माझ्या मनात आहे, सगळ्यांनी पुन्हा एकत्र यावं आणि संघटनेची ताकद महाराष्ट्रात दिसावी, अशी माची इच्छा आहे असंही दानवे म्हणाले आहेत.

गेल्या तीन वर्षात अंबादास दानवे यांनी शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून शिंदेच्या शिवसेनेला व त्यांच्या मंत्र्यांना सभागृहात अन् रस्त्यावर सडेतोड उत्तरं दिले आहे. तसंच, गद्दार, मिंधे गँग, पन्नास खोके म्हणत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला अनेकदा अंगावर घेतले. परंतु, विधान परिषदेचे सदस्य आणि विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर दानवे काहीसे मवाळ झाल्याची चर्चा आहे.

..पण भरलेल्या ताटाशी कधी प्रतारणाही केली नाही, दानवेंच्या समारोप प्रसंगी उद्धव ठाकेंचा शिंदेना टोला

दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत ही इच्छा व्यक्त करत अंबादास दानवे यांनी आपलं मत परिवर्तन झाल्याचं या विधानवरून दाखवून दिलं आहे. शिंदेंची शिवसेना एकत्र आली पाहिजे, ही भूमिका अंबादास दानवे यांची वैयक्तिक आहे की मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते म्हणून त्यांनी ती मांडली अशीही सध्या चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागलं हाही येथे इतिहास आहे.

गेल्या अडीच-तीन वर्षात एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. रश्मी ठाकरे यांनाही यात ओढण्यात आलं. अशा सगळ्या घटना आणि प्रकारानंतर अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, ही इच्छा व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘मी पुन्हा येईन’ यासाठी तर हा खटाटोप नाही ना? अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शिवसेना फुटली याची खंत असून दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अशी आपली इच्छा असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं. शिवसेना म्हणून आपण एकत्र असलं पाहिजे, शिवसेनेची एकत्रित ताकद राज्याला दिसली पाहिजे.आमची संघटना कुणीतरी फोडली याची सल कायम आहे. शिवसेना फुटली त्यावेळी मनाला वेदना झाल्या. आम्ही काही सत्तेसाठी जन्मलो नाही. आमची संघटना फुटली, मनाला झालेली ही वेदना कधी ना कधी भरुन यावी ही अपेक्षा आहे असंही ते यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube