घोटाळा केला नाही, पार्थ पवारांचा दावा; दादांच्या ‘पार्थ’ वर कारवाईचा ‘चाबूक’? फडणवीसांच्या मनात काय?
Parth Pawar Amedia Company Land Scam : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांवर माजी विधानपरिषद विरोधी पक्षनेते
Parth Pawar Amedia Company Land Scam : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांवर माजी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जमीन व्यवहारावरुन आरोप केल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्या अमीडीया हेल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच या खरेदी व्यवहारानंतर फक्त दोन दिवसांमध्ये स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचा दावा देखील अंबादास दानवे यांनी केल्याने आता या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. विरोधक या प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल करत आहे.
पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया
तर दुसरीकडे या प्रकरणावर प्रतिक्रिया देत पार्थ पवार (Parth Pawar) यांनी आपण कोणतही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली मात्र या प्रकरणात अधिकची माहिती देण्यास पार्थ पवार यांनी नाकार दिला. पार्थ पवार यांनी या प्रकरणात अधिक माहिती देण्यास नाकार दिल्याने विरोधकांना राज्य सरकारवर जोरदार टीका करण्याची संधी मिळाली आहे.
चौकशी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची देखील या प्रकरणात पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
🕦 11.40am | 6-11-2025📍Nagpur.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Nagpur https://t.co/kCUcZYwok7
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 6, 2025
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी या प्रकरणाची सगळी माहिती मागवली आहे. महसूल विभाग असेल आयजीआर असेल, जमिनी संबंधित रेकॉर्ड असतील या संदर्भातील सगळी माहिती मी मागवली आहे. या प्रकरणात योग्य ती चौकशीचे आदेश देखील मी दिले आहे. या संदर्भात सगळी माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर मी तुम्हाला सगळी माहिती देणार असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल.
अंबादास दानवेंचे आरोप काय?
मेवाभाऊंच्या राज्यात… 1800 कोटींची जमीन 300 कोटींत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये! उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे 1800 कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं.
गंमत तर पुढे आहे..एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल! दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा.. कमाल झाली!
मेवाभाऊंच्या राज्यात…
१८०० कोटींची जमीन
३०० कोटींत खरेदी,
स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये!उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली.…
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 5, 2025
22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या 48 तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे 27 दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या 40 एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये 500 ! फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र! अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
Larissa Brazilian Model : मी कधीही भारतात…, व्होट चोरीवर ब्राझिलियन मॉडेलचा धक्कादायक दावा
