Larissa Brazilian Model : मी कधीही भारतात…, व्होट चोरीवर ब्राझिलियन मॉडेलचा धक्कादायक दावा
Larissa Brazilian Model : लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या
Larissa Brazilian Model : लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला मदत करण्यासाठी व्होट चोरी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबतचा पुरावा देण्यासाठी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत एका महिलेचा फोटो दाखवत या महिलेने तब्बल 22 वेळा मतदार केला असल्याचा दावा केला होता. यानंतर देशातील राजकारणात ती महिला कोण याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे.
तर आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषदेमध्ये ज्या महिलेचा फोटो दाखवला होता ती महिला ब्राझिलियन मॉडेल असल्याचा दावा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर या महिलेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये तिने काही धक्कादायक खुलासे केले आहे.
फोटोमधील महिला कोण ?
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, फोटोमधील महिलेची ओळख लॅरिसा (Larissa Brazilian Model) म्हणून झाली आहे. तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे ज्यामध्ये तिने स्पष्ट केले आहे की, हा फोटो तिच्या मॉडेलिंगच्या काळातील आहे. हा एक स्टॉक फोटो असून याचा वापर भारतात करण्यात येत आहे. तसेच तिने स्पष्ट केले की, ती कधीही भारतात गेलेली नाही आणि भारतीय राजकारणाशी माझा काडीचाही संबंध नाही पण मला भारतीय लोक आवडतात असं तिने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
Brazilian Model Larissa whose image has been used in Haryana for fake votes reacts to the big expose and irregularities shared by @RahulGandhi today
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) November 5, 2025
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी हरियाणामध्ये व्होट चोरीचा आरोप करत हरियाणा मतदार यादीत एकाच फोटोसह 22 नोंदी आहेत. त्यांनी दावा केला होता की, हा फोटो ब्राझिलियन मॉडेल मॅथ्यूस फेरेरोचा आहे. हा फोटो दाखवत राहुल गांधी यांनी दावा केला होता की, मतदार यादीत कधी स्वीटी, कधी सीमा तर कधी सरस्वती नावाने तब्बल 22 वेळा मतदार यादीत नाव नोंद आहे.
Maharashtra Rain Alert : अहिल्यानगर, रत्नागिरी, सांगलीसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट; धो धो पावसाचा इशारा
तसेच राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत मोठा दावा करत हरियाणा विधानसभा निवडणुकीत तब्बल 25 लाख व्होट चोरी झाली ज्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला.
