‘वंचित’च्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट; आंबेडकरांचा काँग्रेसला सज्जड दम

‘वंचित’च्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट; आंबेडकरांचा काँग्रेसला सज्जड दम

Prakash Ambedkar On Vijay Wadettiwar : माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट असल्याचं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसला सज्जड दम भरला आहे. अकोल्यात आज वंचितच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करीत भूमिका स्पष्ट केली आहे.

WFI च्या निलंबनाच्या याचिकेवर उत्तर द्या; क्रीडा मंत्रालयाला दिल्ली हायकोर्टाने खडसावले

आंबेडकर म्हणाले, मुंबईत मनसे, शिवेसेनेने आधी अनेक आंदोलने उभे केले. लुंगी हटाव, पुंगी बजाव असे अनेक आंदोलने झालीत. यामध्ये उत्तर भारतीयांच्या विरोधातील आंदोलन, धारावीतील छटपूजेला विरोध, बिहारच्या लोकांना मारलं. आता राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिलायं. बिहारचे लोकं मुंबईत राहतात ते दक्षिणेतील कार्यकर्ते आहेत. ज्यांना भाजप जवळची वाटत होती त्यांना आता असुरक्षित वाटू लागली असल्याची टीका आंबेडकरांनी यावेळी केली आहे.

सांगलीत ‘पिक्चर अभी बाकी है’ : विशाल पाटलांच्या बंधूंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट

काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबतची युती तोडली आहे. आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबतचीही युती तोडली आहे. त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. साक्षगंध होण्यापूर्वीच पसंत केल होतं. हुंड्याची चर्चाही करायची होती, पण त्यापूर्वीच त्यांनी लग्न मोडलं, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली होती.

विशाल पाटील लवकरच निर्णय घेतील…
सांगलीमध्ये शिवसेनेचे काहीच नव्हते, पण शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली. आज सकाळीच विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी माझी भेट घेतली आणि चर्चाही केली आहे. लवकरच ते निर्णय घेतील, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज