WFI च्या निलंबनाच्या याचिकेवर उत्तर द्या; क्रीडा मंत्रालयाला दिल्ली हायकोर्टाने खडसावले

WFI च्या निलंबनाच्या याचिकेवर उत्तर द्या; क्रीडा मंत्रालयाला दिल्ली हायकोर्टाने खडसावले

Delhi High Court ask Ministry of Sports on WFI Suspension : दिल्ली उच्च न्यायालयाने ( Delhi Hight Court ) मंगळवारी (9 एप्रिल) भारतीय कुस्ती महासंघ ( WFI ) म्हणजेच डब्ल्यूएफआयने दाखल केलेल्या महासंघाच्या निलंबनाच्या विरोधातील याचिकेवर क्रीडा मंत्रालयाला नोटीस जारी केली आहे. यामध्ये हायकोर्टाने क्रीडा मंत्रालयाला ( Ministry of Sports ) महासंघाच्या निलंबनाच्या विरोधातील याचिकेवर उत्तर मागितले आहे.

..तर आम्ही रामटेक, अमरावतीत नाराजी दाखवू शकतो; राऊतांचा काँग्रेस नेत्यांना स्फोटक इशारा

या याचिकेवर उत्तर देण्यासाठी न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी केंद्र सरकारला चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. तसेच 28 मे ला या प्रकरणी पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान भारतीय कुस्ती महासंघाला 24 डिसेंबर 2023 ला केंद्र सरकारकडून निलंबित करण्यात आलं होतं. हे निलंबन महासंघाचे माजी अध्यक्ष विजय भूषण शरण सिंह यांचे निकटवर्ती असलेले संजय सिंह यांच्याकडे महासंघाचे अध्यक्ष पद आल्यानंतर काही दिवसात करण्यात आलं होतं.

मोहिते पाटलांची घरवापसी! उमेदवारीही फिक्स अन् अर्जाची तारीखही

भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन करताना क्रीडा मंत्रालयाकडून महासंघाने काही निर्णय घाईघाईत घेतल्याचं कारण देण्यात आलं होतं. त्याचबरोबर महासंघाचे नवीन अध्यक्ष यांनी नियमांचं उल्लंघन केलं आहे. असं देखील सांगण्यात आलं होतं. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिम्पिक संघाकडून कुस्ती महासंघाच्या कामकाजासाठी एक समिती गठन करण्यास सांगितले होते.

या समितीकडून देखील नियमांचा उल्लंघन झाल्याच्या सांगण्यात आलं. कुस्ती महासंघाचे वरिष्ठ अधिवक्ता दयान कृष्णन यांनी असा आरोप केला आहे. की, निलंबन करण्याचा क्रीडा मंत्रालयाच्या आदेश हा अन्यायकारकाने भारताच्या राष्ट्रीय खेळ विकास कायदा 2011 चा उल्लंघन आहे. तसेच कुस्ती महासंघाला कोणत्याही नोटीस विना निलंबित करण्यात आलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज