..तर आम्ही रामटेक, अमरावतीत नाराजी दाखवू शकतो; राऊतांचा काँग्रेस नेत्यांना स्फोटक इशारा

..तर आम्ही रामटेक, अमरावतीत नाराजी दाखवू शकतो; राऊतांचा काँग्रेस नेत्यांना स्फोटक इशारा

Sanjay Raut warns Congress Leaders on Sangli Lok Sabha महाविकास आघाडीने काल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला. सांगलीसाठी काँग्रेसने अतोनात प्रयत्न केल्यानंतरही ही जागा काँग्रेसला मिळाली नाही. यानंतर काँग्रेस नेत्यांनी बंडखोरीची भाषा सुरू केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) पुन्हा एकदा काँग्रेसला इशारा दिला आहे. आता जागावाटपात कोणताही बदल होणार नाही. अशाच प्रकारे नाराजी दाखवायची झाली तर आमचे लोकही अमरावती, कोल्हापूर, रामटेकला दाखवू शकतात असा सूचक इशारा राऊत यांनी दिला.

Sanjay Raut : राऊतांकडून मोदींना नवी उपाधी; कंस मामा म्हणत फोडलं नव्या वादाला तोंड

आघाडीत सांगली आणि भिवंडीचा तिढा आहे. सांगलीत आमची ताकद कमी आहे. पण येथे मशाल चिन्हावर मतदान होईल असा विश्वास वाटतो. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस सांगलीत नव्हती. ती जागा मित्रपक्षाला सोडली होती. आमच्या कार्यकर्त्यांनी नाराजी दाखवली नाही. आघाडीचा धर्म पाळला पाहिजे. भिवंडीत राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) उमेदवाराचं काम आमचे लोक करत आहेत. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना समजावून सांगितलं पाहिजे असेही राऊत म्हणाले.

असा आहे मविआचा फॉर्म्युला 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बारामती , शिरूर, सातारा , भिवंडी ‘ माढा, रावेर आणि अहमदनगर दक्षिण या जागा लढणार आहे. तर शिवसेना जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, हातकणंगले, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई या जागा लढणार आहे.

सांगलीचा तिढा वाढला! ‘संजय राऊत मर्यादा पाळा’ नाना पटोलेंनी थेट खडसावलं

काँग्रेस पक्ष नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रावेर, जालना, मुंबई नॉर्थ सेंट्रल, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि नॉर्थ मुंबई 17 जागा लढणार आहे, असे काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज