Sanjay Raut : राऊतांकडून मोदींना नवी उपाधी; कंस मामा म्हणत फोडलं नव्या वादाला तोंड

Sanjay Raut : राऊतांकडून मोदींना नवी उपाधी; कंस मामा म्हणत फोडलं नव्या वादाला तोंड

Sanjay Raut Reaction On Arvind Kejriwal Arrest: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना बेकायदेशीरपणे आणि सूडबुद्धीने अटक करण्यात आल्याचा हल्लाबोल केला. म्हणाले की, अण्णा हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचाराविरोधात लढाई केली. याचीच भाजपाला भीती वाटत आहे. राऊतांकडून हल्लाबोल करताना मोदींना (PM Narendra Modi) नवी उपाधी देण्यात आली आहे. कंस मामा म्हणत नव्या वादाला तोंड फोडलं.

आम आदमी पक्ष इंडिया (Aam Aadmi Party) आघाडीचा घटक पक्ष आहे. अरविंद केजरीवाल यांची अटक राजकीय सूडबुद्धीने केलेली अटक आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. अरविंद केजरीवाल यांना बेकायदेशीर, बदल्याची भावना आणि घाबरून खोट्या केस मध्ये अटक केली, हे सर्वांना माहीत आहे. विश्वगुरूही जाणत आहेत. दिवसेंदिवस त्यांना भीती वाटत आहे.

सध्या राज्यात जंगलराज सुरू आहे. केजरीवाल यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे. तिथे भाजप 5 च्या वर आले नाही. केजरीवाल जेलमध्ये राहून देखील काम करू शकतात. केजरीवाल यांना लोकांनी निवडून आणले. ईडी, सीबीआय यांनी नाही. त्यामुळे लोक सांगतील. कंसाला ज्यांची ज्यांची भीती होती, सर्वांना त्यांनी तुरुंगात टाकल होतं. अगदी देवाला देखील तुरुंगात टाकल होत. ईडीने केजरीवाल यांना जेलमध्ये न पाठवता भाजप अध्यक्षांना जेलमध्ये टाकले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरेंचा तीन जागांवर दावा, ‘नाशिक’च्या मागणीने भाजप-शिंदे सेनेत अस्वस्थता

याआधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींना औरंगजेबाची उपमा दिली होती. म्हणाले होते की, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube