Sanjay Nirupam On Sanjay Raut : संजय राऊत आता काँग्रेसही संपवणार, काँग्रेसमधील नेत्याचा हल्लाबोल!

  • Written By: Last Updated:
Sanjay Nirupam On Sanjay Raut : संजय राऊत आता काँग्रेसही संपवणार, काँग्रेसमधील नेत्याचा हल्लाबोल!

Sanjay Nirupam On Sanjay Raut : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुद्ध महायुती (Maha Yuti) यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे.  मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सध्या जागावाटपावरून अनेक मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

यातच अमोल किर्तीकरांना (Amol Kirtikar) मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे गट) ने उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस नेते संजय निरुपम संतापले आहेत.

एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी संजय राऊतांसह शिवसेनेवर टीका केली आहे. या कार्यक्रमात एका पत्रकाराने संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांना संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिवसेना (Shiv Sena) संपवली, तुम्हाला असं वाटतं का ? असं प्रश्न विचारला.

Google देणार 50 कोटी लोकांना धक्का, आजपासून बंद करणार ‘ही’ सर्व्हिस

या प्रश्नाचं उत्तर देताना संजय निरुपम म्हणाले, राऊतांनी शिवसेना संपवली त्यानंतर राष्ट्रवादी (NCP)संपवली आणि आमची काँग्रेस (Congress) संपवण्याचा प्रत्यन करत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ज्याप्रमाणे शिवसेनेने जोर देत मुंबईतील सहा जागांपैकी पाच जागा घेतले आणि राज्यातील 48 जागांपैकी जास्त जागांचा हट्ट केला परंतु त्यांच्याकडे काही नाहीय, त्यांचे नेते- कार्यकर्ते पळाले यामुळे त्यांच्याकडे मतदान किती आहे? याचीही कोणाला माहिती नाही मात्र तरीही त्यांनी आमच्याकडून हट्ट करत जास्त जागा घेतले.

मोठी बातमी, छत्रपती संभाजीनगरात कपड्याच्या दुकानाला आग, 7 जणांचा मृत्यू

लोकसभा निवडणुकीपूर्वी मी भाकीत करतो की, या लोकसभा निवडणुकीत शिवसेना मुंबईमधील पाचच्या पाच जागा गमवणार. संजय निरुपम पुढे म्हणाले, मुंबईत शिवसेना एकही जागा जिंकणार नाही आणि यानंतर शिवसेना संपणार आणि काँग्रेसही संपणार. याचा कारण म्हणजे या पाचही मतदारसंघातील कार्यकर्ता विखुरणार.

इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या, तैवानमध्ये शक्तिशाली भूकंप

आम्ही त्यांना मुंबईत तीन- तीन जागांचा प्रस्ताव दिला होता. तुम्ही मुंबईत पाच जागा घेणार तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना काय सांगणार? सध्या मुबई आणि राज्यात ठाकरे गटाची ताकत काय आहे याची कोणाला माहिती नाही, असंही ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज