Chhatrapati Sambhajinagar Fire News : मोठी बातमी, छत्रपती संभाजीनगरात कपड्याच्या दुकानाला आग, 7 जणांचा मृत्यू  

  • Written By: Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar Fire News : मोठी बातमी, छत्रपती संभाजीनगरात कपड्याच्या दुकानाला आग, 7 जणांचा मृत्यू  

Chhatrapati Sambhajinagar Fire News : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar)  एका कपड्याच्या दुकानाला आग  लागल्याने ७ जणांचा मुत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ४ च्या सुमारास छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या (Mahavir Jain Temple) बाजूला असणाऱ्या एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली.

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर रामदेव बाबांनी मागितली माफी, माघार घेत, म्हणाले …

या आगीत दुकानाच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या ७ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलानंसह घटनास्थळी धाव घेतली मात्र तो पर्यंत या भीषण आगीमुळे सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Google देणार 50 कोटी लोकांना धक्का, आजपासून बंद करणार ‘ही’ सर्व्हिस

शहरातील कॅन्टोन्मेंट परिसरात असणाऱ्या एका कपड्याच्या दुकानाला पहाटे चारच्या सुमारास आग लागली.

OnePlus Nord CE4 भारतात लॉन्च! मिळणार जबरदस्त फीचर्ससह पावरफुल बॅटरी; खर्च होणार फक्त ‘इतके’ पैसे

प्राथमिक तपासानंतर या दुर्घटनेत सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला असून अद्याप आगीचं कारण स्पष्ट झालेले नाही,अशी माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया (Chhatrapati Sambhaji Nagar Police Commissioner Manoj Lohia) यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज