छत्रपती संभाजीनगर से मजलिस को भगाना है; भाषणाच्या सुरुवातीलाच शाहांनी डिवचलं
Amit Shah News : छत्रपती संभाजीनगर से मजलिस को भगाना है, नव्या निजामांना घरी बसवा, या शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांना डिवचलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अकोल्यात आज त्यांनी भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
हेमंत पाटलांना धोक्याची घंटा! भाजप हिंगोली घेण्याच्या अन् सरप्राईज उमेदवारही देण्याच्या तयारीत
अमित शाह म्हणाले, संभाजीनगर से मजलिस को भागाना है, असं म्हणत शाहा यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच एमआयएमचा उल्लेख करीत डिवचलं आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी मराठी लोकांना मुक्त केलं आणि मजलिसला पळवून लावलं होतं. मराठी लोकांना पटेलांनी निजामापासून मुक्ती दिली होती. आता जनतेने या नव्या निजामांना पुन्हा घरी बसवण्याचं केलं पाहिजे, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना अमित शाह यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले, इंडिया आघाडी म्हणजे घमंडिया गठबंधन असून ज्या पक्षाच्या नेत्यांना आपल्या मुलांचं भलं करायचं ते जनतेचं भल करतील का? असा सवालही अमित शाह यांनी यावेळी केला आहे. तसेच भाषणाच्या सुरुवातीलाच शाह यांनी छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करीत देशाला स्वातंत्र्याचा मंत्र देणारे छत्रपती शिवराय असल्याचं स्पष्ट केलं आहे.
वादातील जागांचा चंद्रकांतदादांकडून आढावा, तिढा सुटण्याची शक्यता
जाहीर सभेत बोलताना शाह यांनी केंद्र सरकारच्या विविध विकासकामांचा लेखाजोखाच मांडला आहे. मागील दहा वर्षांत आम्ही काम केलं आहे. आमच्याकडे रेकॉर्ड आहे, रोडमॅपदेखील आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना माझा सवाल आहे की सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग सरकारने महाराष्ट्राला काय दिलं? यावर चर्चेसाठी भाजपचा कार्यकर्ता शिवरायांच्या पुतळ्याजवळ चर्चेसाठी तयार आहे, तुम्ही लेखाजोखा घेऊन या.. असं खुलं आव्हान अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना दिलं आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 14 ते 23 सालापर्यंत 1 लाख 51 हजार करोडऐवजी तब्बल 7 लाख 15 हजार 890 करोड रुपये देण्याचं काम केलं आहे. तसेच 1 करोड 20 लोकांना पिण्याचं पाणी दिलं, 1 करोड लोकांना आयुष्मान भारत योजना मिळाली, 7 करोड लाभार्थ्यांना धान्य मिळालं, 51 लाख महिलांना गॅस देण्याचं काम केलं, महाराष्ट्रातल्या 12 लाख लोकांना घरे दिली असल्याचं मंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे.