राहुल गांधी पुन्हा अडचणीत, अमित शाहांवर टीका केल्याने समन्स जारी

राहुल गांधी पुन्हा अडचणीत, अमित शाहांवर टीका केल्याने समन्स जारी

Rahul Gandhi : उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील एमपी-एमएलए न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर केलेल्या टिप्पणीप्रकरणी समन्स बजावले आहे. 6 जानेवारीपर्यंत हजर राहण्यास सांगितले आहे. 2018 मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात टिप्पणी करून त्यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायालयाने राहुल गांधींना शनिवारी हजर राहण्याचे निर्देश दिले होते मात्र ते हजर झाले नाहीत. हा गुन्हा भाजप नेते विजय मिश्रा यांनी 4 ऑगस्ट 2018 रोजी नोंदवला होता.

राहुल गांधी कोर्टात आलेच नाहीत
राहुल गांधींविरुद्ध खटला दाखल करणारे विजय मिश्रा यांचे वकील संतोष पांडे म्हणाले की, सुलतानपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने या प्रकरणात राहुल गांधींना 16 डिसेंबरला समन्स बजावले होते, पण ते हजर झाले नाहीत. आता कोर्टाने त्याच्या विरोधात समन्स बजावले असून त्याला 6 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कानाखाली आवाज काढून सांगावे लागेल, पवारांनी काय केलंय; अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

राहुल गांधींवर काय आरोप होते?
राहुल गांधींवर गुन्हा दाखल करणाऱ्या विजय मिश्रा यांनी सांगितले होते की ही घटना घडली तेव्हा ते भाजपचे उपाध्यक्ष होते. राहुल गांधी यांनी अमित शहा हे खुनी असल्याचा आरोप बेंगळुरूमध्ये केला होता.

अदानींनी ठाकरेंवरच डाव उलटवला, ‘धारावी प्रकल्पाच्या अटी मविआच्या काळातीलच….’

विजय मिश्रा म्हणाले, हे आरोप ऐकून मला खूप वाईट वाटले कारण मी 33 वर्षांपासून पक्षाचा कार्यकर्ता आहे. विजय मिश्रा यांनी एएनआयला सांगितले की, मी माझ्या वकिलामार्फत या संदर्भात तक्रार दाखल केली आणि हे प्रकरण जवळपास 5 वर्षे चालू राहिले. 2018 मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेंगळुरूमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. जिथे राहुल गांधींनी अमित शाह यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, असे सांगण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube