अदानींनी ठाकरेंवरच डाव उलटवला, ‘धारावी प्रकल्पाच्या अटी मविआच्या काळातीलच….’

  • Written By: Published:
अदानींनी ठाकरेंवरच डाव उलटवला, ‘धारावी प्रकल्पाच्या अटी मविआच्या काळातीलच….’

Adani Group : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून (Dharavi Redevelopment Project) अदानी समूहाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, नेते सहभागी झाले होते. सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारसह अदानी समूहावर (Adani Group) जोरदार टीका केली. यानंतर अदानी समूहाकडून एक खुलासा समोर आला. धारावी प्रकल्पाच्या अटी व शर्ती महाविकास आघाडी सरकारच्या काळातील असल्याचं अदानी समूहाने सांगितलं.

मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम, सरकारला आतापर्यंत भरपूर वेळ दिला 

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर अदानी समूहाने एक पत्रक जारी केले आहे. यामध्ये अदानी समूहाने म्हटले आहे की, धारावी प्रकल्प निष्पक्ष, खुल्या आणि आंतरराष्ट्रीय बोलीद्वारे अदानी समूहाला देण्यात आला. धारावी प्रकल्पाच्या अटी व शर्ती महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहेत. निविदा प्रक्रियेनंतर सुहाने या अटींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे समुहाला कुठल्याही स्वरुपाचा लाभ झाल्याचा दावा करणं चुकीचं आहे, असं पत्रकात म्हटलं. त्यात पुढं म्हटलं की, हे दुर्दैवी आहे की धारावी प्रकल्पाबाबत चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व सदनिकाधारकांना धारावीत घरे दिली जातील. याव्यतिरिक्त, पात्र भाडेकरूंना मुंबईतील SRA पेक्षा 17 टक्के अधिक क्षेत्र मिळेल, असं अदानी समूहाने सांगितले.

या पत्रात लिहिलं की, टीडीआर निविदा अटी आणि कायद्यानुसारच टीडीआरचं पालन केलेलं आहे. धारावीकरांच्या पुनर्वसनावर टीडीआरचा कोणताही परिणाम होणार नाही. मुंबई महापालिका आणि सरकारने तयार केलेल्या संकेतस्थळावर ‘टीडीआर’चे व्यवस्थापन करून त्याचे परीक्षण केले जाईल, असंही अदानी समुहाने सांगितलं.

Government Schemes : किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल? 

धारावीचा कायापालट करून इथल्या लोकांना उत्तम राहणीमान, पुरेशी स्वच्छता, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण, आरोग्य सेवा, रोजगाराच्या संधी, अत्यावश्यक सुविधा पुरवणं हे केवळ मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात एकमत झालं आहे असंही या निवदेनात म्हटलं आहे.

ठाकरेंची टीका काय?
धारावी पुर्निकास प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातील नाही. धारावीसाठी गरज पडली तर मुंबईच काय महाराष्ट्र धारावीसाठी उतरवेन. ज्यांनी ज्यांनी अदानींची सुपारी कोणी घेतली आहे. त्यांना चेचून काढू, पन्नास पेट्या कमी पडायला लागल्यानं सत्ताधारी आता धारावी विकायला लागले. अडीच वर्ष उत्तर चालणारं सरकार हे गद्दारी करून पाडले, हे आता सर्वांना समजलं. त्यासाठी खोके कोणी पुरवले, हॉटेल बुकिंग कोणी केले हे सर्वांना कळलं. धारावीतील सर्व शौचालये आणि स्नानगृहांचा टीडीआर अदानींना देण्यात आला. फक्त पाऊस पाडणाऱ्या ढगांचा ‘टीडीआर’ दिला गेला नाही. कारण, बिनसवलीच्या ढगांचा पाऊस इतका पाडला आहे की, आणखी ढगांची गरजच नाही, असंही ठाकरे म्हटले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज