‘उद्धव ठाकरेंचा मोर्चा फुसका बार, स्वत:ची निष्क्रियता झाकण्याचा प्रयत्न…’; बावनकुळेंची टीका

  • Written By: Published:
‘उद्धव ठाकरेंचा मोर्चा फुसका बार, स्वत:ची निष्क्रियता झाकण्याचा प्रयत्न…’; बावनकुळेंची टीका

Chandrasekhar Bawankule : अदानी समूह धारावीतील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणार आहे. ठाकरे गटाने याला विरोध केला असून त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज धारावी ते बीकेसीतील अदानी समूहाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)उपस्थित जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी ठाकरेंवर टीका केली.

Rohit Saraf : ठरलं तर! मिसमॅच्ड 3 लवकरच येणार, रोहितने दिली खुशखबर 

बावनकुळे म्हणाले, उध्दव ठाकरे यांचा आजचा मोर्चा फुसका बार आहे. ठाकरेंना संधी असतांना त्यांना विकास करत आला नाही. आता आमचं सरकार बदल घडवण्यचाा प्रयत्न करत आहे, मात्र ठाकरे फक्त विरोध करत आहे. स्वत:च्या निष्क्रियतेला सक्रियता दाखवावी लागते, तेव्हा असे प्रयत्न केले जातात…. तुमच्या हातात अधिकार असताना फेसबुक लाईव्हवर राहिले. अडीच वर्षे मंत्रालयात आले नाही. त्यामुळं महाराष्ट्र मागे आला, मुंबईचा विकास थांबला. आता हे पाप लपवण्याकरिता धारावी विकासाचा ब्लंडर बनवायचा आणि जनतेला मूर्ख बनवण्याकरिता मोर्चे काढायचे, मोर्चातील 90 टक्के लोकांना विषय माहीत नाही, असं बावनकुळे म्हणाले.

धारावीसाठी उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या मोडमध्ये; ऑफिस तुमचं असलं तरी रस्ते आमचे 

ते म्हणाले, ठाकरे हे महाविकास आघाडीच्या काळात धारावी पुनर्विकासाचे काम का करू शकले नाहीत. त्यांच्या काळात धारावीचा पुनर्विकास होऊ शकला नाही, याचे ठाकरे यांना शल्य आहे, म्हणूनच ते मोर्चा काढत आहेत. पण हे काम आपल्या काळात होत आहे. धारावीकरांचं जीवनमान उंचावणार आहे. मोर्चा काढून ठाकरे खोट्या गोष्टी समोर आणून सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मोर्चे काढून केवळ थापा मारण्याचं काम ठाकरे करत आहे. या मोर्चाने काहीही फरक पडणार नाही.

पुढं बोलतांना बावनकुळे म्हणाले, आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची हिंमत कोणाच्या बापाची, कोणाच्या पक्षाची नाही. केवळ जनतेला कंन्फूज करण्यासाठी ठाकरेंना तसं बोलावे लागते. मात्र, आता लोकही त्यांच्या बोलण्याला कंटाळले आहेत, असं बावऩकुळे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज