कॉंग्रेस अॅक्शनमोडमध्ये, कमलनाथांचे प्रदेशाध्यक्षपद काढलं, आता जीतू पटवारींकडे धुरा

  • Written By: Published:
कॉंग्रेस अॅक्शनमोडमध्ये, कमलनाथांचे प्रदेशाध्यक्षपद काढलं, आता जीतू पटवारींकडे धुरा

Jeetu Patwari MP Congress Presoident : यंदा झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चांगलाच पराभव झाल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र, पण, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने काँग्रेसला पराभवाची धुळ चारली. दरम्यान, आता मध्य प्रदेशातील पराभवानंतर काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ (Kamal Nath) यांची प्रदेशाध्यक्षपदारून गच्छंती केली पक्ष नेतृत्वाने जीतू पटवारी (Jeetu Patwari) यांना प्रदेशाध्यक्ष केले आहे.

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची शक्यता मावळली, हायकोर्टाकडून आदेशात मोठा बदल 

काँग्रेस कमलनाथ यांचे पद काढून घेऊ शकते, अशी अनेक दिवसांपासून चर्चा होती. याआधीही असे वृत्त आले होते. पण त्यानंतर कमलनाथ यांनीच ते फेटाळून लावले होते. मात्र, अखेर आज त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार काढून घेतला. आणि जीतू पटवारी यांच्यावर जबाबदारी दिली. काँग्रेसने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे मल्लिकार्जुन खर्गे यांनी जीतू पटवारी यांची मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या देखरेखीखाली पक्षाचा आणखी विस्तार करायचा आहे.

Government Schemes : किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल? 

कमलनाथ गेल्या सात वर्षांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते. 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला होता, मात्र 2023 च्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते. काँग्रेसमध्ये बदल होईल, अशी अटकळ बांधली जात होती, त्याचा परिणाम आज दिसून आला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राजधानी भोपाळमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कमलनाथ यांनी या बैठकीपासून अंतर राखले होते, तर रणदीप सुरजेवाला यांच्यासह भंवर जितेंद्र सिंह, दिग्विजय सिंह या बैठकीत उपस्थित होते. मात्र, विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत विरोधी पक्षनेत्याच्या नावावर एकमत होऊ शकले नाही. बैठकीनंतर ज्येष्ठ आमदार अजय सिंह म्हणाले होते की, या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय दिल्ली हायकमांड घेईल, असा एक ओळीचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे दिल्ली हायकमांडने राज्यात मोठे फेरबदल केले आहेत.

काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडने आता प्रदेशाध्यक्षपदाची कमान कमलनाथ यांच्या जागी जितू पटवारी यांच्याकडे सोपवली आहे. त्याचबरोबर आदिवासी नेते उमंग सिंघार आणि विरोधी पक्षनेते हेमंत काटाणे यांना विरोधी पक्षनेते करण्यात आले आहे. पक्षाने छत्तीसगडमधील विरोधी पक्षनेतेपदी चरणदास महंत यांची निवड केली आहे. दीपक बैज यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे. यावेळी छत्तीसगडमध्येही काँग्रेसला भाजपकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

कोण आहे जीतू पटवारी ?

50 वर्षीय जीतू पटवारी 2013 मध्ये राऊळ मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. सध्या ते काँग्रेसचे सचिव आणि गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी आहेत. ते मध्य प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षही राहिलेले आहेत. यावेळीही काँग्रेसने राऊळ जागेवर जितू पटवारी यांना उमेदवारी दिली होती, परंतु त्यांचा भाजपच्या मधु वर्मा यांच्याकडून पराभव झाला होता, तर 2018 मध्ये जीतू पटवारी यांनी मधू वर्मा यांचा 5703 मतांनी पराभव केला होता. जितू पटवारी हे राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. ते कमलनाथ सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.

आतापर्यंत माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घोषणेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube