वादातील जागांचा चंद्रकांतदादांकडून आढावा, तिढा सुटण्याची शक्यता

वादातील जागांचा चंद्रकांतदादांकडून आढावा, तिढा सुटण्याची शक्यता

Loksabha Election 2024 : बारामती, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. तीनही जागांचा आढावा घेतल्यानंतर चंद्रकांतदादा वरिष्ठांना अहवाल सादर करणार आहेत. बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघावर (Loksabha Election) राष्ट्रवादीकडून दावा केला जात आहे. तर पुण्याच्या जागेवर भाजपचा दावा आहे. यामध्ये शिवसेनेकडून शिरूरच्या जागेचा आग्रह धरला जात असल्याचे बोलले जाते.

आगामी लोकसभा निवडणुका भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह महायुती एकदिलाने आणि पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे, असा निर्धार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. चंद्रकांत पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे निवडणूक काळात महायुतीमध्ये योग्य समन्वय रहावा. प्रचारामध्ये कोणते मुद्दे असावेत, त्यातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये स्पष्टता असावी यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांची बारामती, शिरुर, आणि पुणे लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने आणि पूर्ण ताकदीने निवडणूक लढण्याचा निर्धार केला.

कोल्हापूरच्या बदल्यात काँग्रेसने सोडला हक्काचा मतदारसंघ… सांगली आता ठाकरे गटाकडे

ते पुढे म्हणाले की, लोकसभेमध्ये एनडीएला ४०० पार करुन मोदींना पुन्हा पंतप्रधान करणं, यावर सर्वांचं एकमत आहे. आजच्या लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकीनंतर प्रत्येक पक्षाचे नेते विधानसभा मतदारसंघ आणि बूथ स्तरापर्यंत जाऊन संपर्क करणार आहेत.

पाटील पुढे म्हणाले की, जम्मू काश्मीर मध्ये ३७० कलम हटविण्यात आलं. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात बूथवर मिळणाऱ्या मतांमध्ये ३७० मते अधिक मिळाली पाहिजेत, अशी सूचना पक्ष श्रेष्ठींनी केली आहे. त्यामध्ये महायुतीच्या घटक पक्षांची मतांची संख्या काढली, ती देखील ४०० पार करतील, आणि लोकसभेच्या सर्व ४८ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दुसऱ्यांच्या खिशात हात घालणे हाच ठाकरेंचा उद्योग; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रकांत पाटील हे लवकरच बारामती, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचा तालुकानिहाय दौरा करणार असून, याद्वारे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

…तर मग अजित पवारांना बरोबर का घेता? आंबेडकरांचा नैतिकतेवरुन खडा सवाल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज