OnePlus Nord CE4 भारतात लॉन्च! मिळणार जबरदस्त फीचर्ससह पावरफुल बॅटरी; खर्च होणार फक्त ‘इतके’ पैसे
OnePlus Nord CE4 : भारतीय बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी मोबाईल कंपनी OnePlus पुन्हा एकदा बाजारात मोठा धमाका करत आपला नवीन फोन लाँन्च केला आहे.
कंपनी OnePlus Nord CE4 या नावाने आपला नवीन स्मार्टफोन लाँन्च केला आहे. ग्राहकांना या नवीन स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्ससह पावरफुल बॅटरी कंपनीकडून देण्यात येणार आहे.
हा नवीन फोन गेल्या वर्षी लाँन्च करण्यात आलेल्या OnePlus Nord CE3 चा अपग्रेडेड व्हर्जन आहे. कंपनीने भारतीय बाजारात हा फोन दोन व्हेरियंटमध्ये लाँन्च केला आहे. यामुळे ग्राहकांना हा फोन आता 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरियंटमध्ये खरेदी करता येणार आहे.
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर रामदेव बाबांनी मागितली माफी, माघार घेत, म्हणाले …
8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरियंट खरेदीसाठी तुम्हाला 24,999 रुपये तर 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी तुम्हाला 26,999 रुपये मोजावे लागणार आहे. या फोनची विक्री 4 एप्रिल 2024 पासून दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. मग जाणून घेऊया या स्मार्टफोनमध्ये कंपनी तुम्हाला कोणत्या कोणत्या नवीन फीचर्स देत आहे.
OnePlus Nord CE 4 डिस्प्ले
कंपनीने OnePlus Nord CE 4 मध्ये फुलएचडी प्लस एमोलेड डिस्प्ले सपोर्ट दिला आहे. तुम्हाला या फोनमध्ये 6.7 इंच डिस्प्ले कंपनीकडून देण्यात आला जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. तर हा फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चिपसेटला सपोर्ट करतो.
तुम्हाला हा फोन 4 डार्क क्रोम आणि सेलाडॉन मार्बल या दोन रंगात खरेदी करता येणार आहे.
लालूंनी मोदींचा परिवार विचारून केली चूक? विरोधकांची टीकाच भाजपसाठी इलेक्शन टॉनिक!
OnePlus Nord CE 4 कॅमेरा
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने OnePlus Nord CE 4 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला असून या फोनचा मेन कॅमेरा 50MP आहे. तर 8MP अल्ट्रा वाईड कॅमेरा सेटअप देखील तुम्हाला या फोनमध्ये कंपनीकडून ऑफर करण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी तुम्हाला 16MP सेल्फी कॅमेरा कंपनीने ऑफर केला आहे.
OnePlus Nord CE 4 बॅटरी
तर या फोनमध्ये पावरफुल बॅटरी देखील कंपनीकडून ऑफर करण्यात येत आहे. OnePlus Nord CE 4 तब्बल 5500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Google देणार 50 कोटी लोकांना धक्का, आजपासून बंद करणार ‘ही’ सर्व्हिस
100W SuperVOOC फास्ट चार्जिंगला हा फोन सपोर्ट करतो ज्यमुळे अवघ्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला एक दिवस वापरता येणारी बॅटरी चार्ज होते. फोनमध्ये यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट आहे. कंपनीकडून 4 वर्षांची बॅटरी लाईफ देखील तुम्हाला देण्यात आली आहे.