GPay आणि Phonepe ला टक्कर देण्यासाठी येतेय TATA Pay अॅप, आरबीआयने दिली मंजुरी

GPay आणि Phonepe ला टक्कर देण्यासाठी येतेय TATA Pay अॅप, आरबीआयने दिली मंजुरी

TATA Pay : मागील तीन-चार वर्षात देश मोठ्या प्रमाात डिजिटलायझेशनकडे (Digitalization) वळला. UPI पेमेंट सिस्टमने तर सर्वसामान्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली. UPI वापरून तुम्ही कोणालाही, कुठेही कितीही रक्कम पाठवू शकता. त्यामुळे लोक त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागले. भाज्या खरेदी करण्यापासून ते शेअर्स खरेदी करण्यापर्यंत सर्वत्र लोक UPI वापरत आहेत. गुगल पे(Google Pay), फोन पे, पेटीएम सारखी अॅप्स ऑनलाइन व्यवहारांसाठी (online transactions) वापरली जातात. आता टाटा आपले पेमेंट अॅपही लॉन्च करणार आहे.

Rohit Pawar : ‘राजकीय गैरअर्थ काढू नका!’ गैरहजेरीच्या चर्चांवर रोहित पवारांचं ‘सोशल’ उत्तर 

आता टाटा कंपनीलाही त्यांच्या ऑनलाइन पेमेंट अॅपसाठी आरबीआयची मंजुरी मिळाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने १ जानेवारी रोजी टाटा समूहाच्या टाटा पे या डिजिटल पेमेंट अॅपला पेमेंट अॅग्रिगटर परवाना मिळाला आहे. म्हणजे आता कंपनी ई-कॉमर्स व्यवहार करू शकते. टाटा पे हा कंपनीच्या टाटा डिजिटल युनिटचा भाग आहे. या माध्यमातून कंपनी डिजिटल व्यवसाय करते. त्यामुळं आता सगळ्या पेमेंट अॅपला टाटा पे टक्कर देण्याच्या तयारीत आहे.

Explainer : SC ने अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या CBI किंवा SIT चौकशीचे आदेश का दिले नाही? 

Tata Pay देखील Razorpay, Cash Free, Google Pay आणि इतर कंपन्यांच्या श्रेणीत सामील झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेमेंट एग्रीगेटर परवान्यासह, टाटा त्याच्या उपकंपन्यांमधील सर्व ई-कॉमर्स व्यवहार सक्षम करू शकते. यामुळे निधीचे उत्तम व्यवस्थापन होण्यास मदत होईल.

टाटा पे सोबत Groww या गुंतवणूक प्लॅटफॉर्मचं पाठबल असलेलं बेंगळुरूतल्या डिजिओ या ओळख पडताळणी स्टार्टअपने पीए लायसन्सदेखील मिळवलं आहे. डिजिओ अनेक फिनटेकसाठी डिजीटल ओळख सुविधा देत आणि पेमेंट सेवा प्रदान करण्यास सक्षम असणार आहे.

सध्या बाजारात कोणती पेमेंट अॅप्स उपलब्ध आहेत?

भारतात सध्या अनेक पेमेंट अॅप्स उपलब्ध आहेत. त्यापैकी काही सर्वात लोकप्रिय अॅप्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Google Pay: Google Pay हे Google ने विकसित केलेले भारतीय डिजिटल पेमेंट सिस्टम अॅप आहे. हे अॅप भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या पेमेंट अॅप्सपैकी एक आहे.

फोन पे: फोन पे हे फ्लिपकार्टने विकसित केलेले भारतीय डिजिटल पेमेंट सिस्टम अॅप आहे. हे अॅप भारतातील दुसरे सर्वाधिक वापरले जाणारे पेमेंट अॅप आहे. फोन पे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पेमेंट करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

पेटीएम: पेटीएम हे भारतीय डिजिटल पेमेंट सिस्टम अॅप आहे. हे अॅप पेटीएमने विकसित केले आहे. पेटीएम हे भारतीतील सर्वाधिक वापरले जाणारे तिसरे पेमेंट अॅप आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पेमेंट करण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज