Ramdev Baba : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर रामदेव बाबांनी मागितली माफी, माघार घेत, म्हणाले …

Ramdev Baba : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर रामदेव बाबांनी मागितली माफी, माघार घेत, म्हणाले …

Ramdev Baba Latest Updates : बाबा रामदेव (Ramdev Baba) यांनी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) हजर राहून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात माफी मागितली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात पतंजली आयुर्वेद कंपनीचे ( Patanjali Ayurveda Company) एमडी आचार्य बाळकृष्ण आणि योग गुरु बाबा रामदेव यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानुसार आज पतंजली आयुर्वेद कंपनीचे एमडी आचार्य बाळकृष्ण (Acharya Balkrishna) आणि योग गुरु बाबा रामदेव न्यायालयात हजर झाले होते.

महायुतीत राजकीय भूकंप, हेमंत गोडसे घेणार मोठा निर्णय? आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

आज या प्रकरणात सुनावणी सुरु झाल्यानंतर रामदेव यांच्या  वकिलांनी म्हटलं की, आम्ही केलेल्या चुकूबद्दल आम्ही माफी मागतो. न्यायालयाच्या आदेशानुसार आज स्वतः योगगुरु बाबा रामदेव न्यायालयात आले आहे. न्यायालयाने त्यांच्या माफीची नोंद घ्यावी.

तर या प्रकरणात योग गुरु बाबा रामदेव यांच्या वकिलांनी पुढे म्हटलं, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आमच्या मीडिया प्रमुखांना माहिती नव्हती त्यामुळे आमच्याकडून अशी चूक झाली.

मात्र यावर न्यायमूर्ती अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या कोर्टाने म्हटलं की, तुम्हाला याची माहिती नव्हती, असं समजणं अवघड आहे.

Google देणार 50 कोटी लोकांना धक्का, आजपासून बंद करणार ‘ही’ सर्व्हिस

प्रकरण काय

सर्वोच्च न्यायालयाने 2023 मध्ये  पतंजली आयुर्वेद कंपनीला आदेश देत दिशा भूल करणाऱ्या जाहिरातींना माघारी घेण्याचे आदेश दिले होते आणि जर कंपनीने असं केलं नाहीतर यावर आम्ही कारवाई करून कंपनीच्या प्रत्येक चुकीच्या जाहिरातींवर एक कोटी रुपयांचा दंड आकारण्यात येईल असं सांगितले होते.

रामदेव बाबांचे कौतुक

रामदेव बाबांनी योगाच्या क्षेत्रात मोठं काम केलं असल्याने न्यायमूर्ती अमानुल्ला यांनी रामदेव बाबांचे कौतुक करत अॅलोपथी औषधांवर असे दावे करणं चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

लोकसभेसाठी शरद पवारांचे स्टार प्रचारक ठरले; आमदार-खासदारांची मोठी यादी पाहाच

तर न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी या प्रकरणात केंद्र  सरकारचेही कान खेचले. या प्रकरणात केंद्र सरकारने आपले डोळे बंद केल्याचं दिसून येतंय, याचं आम्हाला आश्चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज