‘…तर आमचाही शिवसेना उमेदवारांना विरोध’; अजितदादांच्या आमदाराने बोलून दाखवलं

‘…तर आमचाही शिवसेना उमेदवारांना विरोध’; अजितदादांच्या आमदाराने बोलून दाखवलं

Anna Bansode : विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) महायुतीचा धर्म पाळला नाहीतर शिवसेनेच्या उमेदवारांना राष्ट्रवादीचा विरोध असणार असल्याचा इशारा अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी दिला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी तयारी करीत आहेत. याच मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार असणार आहेत. तरीही विजय शिवतारेंनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे महायुतीमध्ये बारामतीच्या जागेवरुन मोठा पेच निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. अशातच आता विजय शिवतारेंनी अजितदादांविरोधात घेतलेल्या भूमिकेवरुन अण्णा बनसोडे आक्रमक झाले आहेत.

‘गट फुटला म्हणून पवार कुटुंबात फूट नाही’; पवारांच्या बहिण सरोज पाटलांनी थेट सांगितलं

आमदार बनसोडे म्हणाले, मागील अनेक दिवसांपासून राज्यात महायुतीचं सरकार काम करीत आहे. विजय शिवतारे यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो ते माजी मंत्रीही आहेतय. आज अजितदादांबद्दलच त्यांचं बोलणं योग्य नाही. महायुतीचा धर्म पाळणं हे त्यांचे कर्तव्य आहे जर नाही पाळला तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून महायुतीचा धर्म पाळला जाणार नाही. ज्या ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार असतील त्यांना आमचा विरोध राहणार असल्याचा इशारा बनसोडे यांनी शिंदे गटाला दिला आहे.

गोमांसाच्या कत्तलखान्यांकडून निवडणूक रोखे घेणाऱ्यांनी हिंदुत्व शिकवू नये; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना समजावून सांगितलं आहे. जर ते ऐकत नसतील आणि महायुतीचा धर्म पाळणार नसतील तर शिंदे गटाच्या उमेदवारांना आमचा कडाडून विरोध असणार आहे. महायुतीत सर्वच पक्ष सामिल आहेत, सर्वपक्षीयांनी महाुतीचा धर्म पाळला नाहीतर अशीच परिस्थिती महाराष्ट्रात दिसणार आहे. आम्ही महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही. आम्ही तटस्थ राहून, कोणाचाही प्रचार करणार नाही. विजय शिवतारेंची बदल्याची भावना असेल तर आम्ही त्याचा उद्रेक करणार असल्याचंही बनसोडे म्हणाले आहेत.

माजी आमदार विजय शिवतारे यांची बारामती लोकसभा मतदारसंघात तळपत असलेली तलवार म्यान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मावळमध्ये शिवसेनेचे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा धर्म पाळत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बेताल, शिवराळ भाषेत बोलत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. शिवतारे यांनी अजित पवारांची जाहीर माफी मागावी. जोपर्यंत ते माफी मागणार नाहीत, माघार घेणार नाहीत, तोपर्यंत आम्ही मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असा इशारा पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज