गोमांसाच्या कत्तलखान्यांकडून निवडणूक रोखे घेणाऱ्यांनी हिंदुत्व शिकवू नये; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

गोमांसाच्या कत्तलखान्यांकडून निवडणूक रोखे घेणाऱ्यांनी हिंदुत्व शिकवू नये; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुलढाणा लोकसभेचा (Buldhana Lok Sabha) दौरा केला. या दौऱ्या दरम्यान आयोजित सभेला संबोधित करतांना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेने हिंदुत्व सोडले असे म्हणणारे गोमांस कत्तलखाने चालवणाऱ्यांकडून निवडणूक रोखे घेतात, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, कारण असल्या थोतांडाला जनता मिरवणूकीत कापल्याशिवाय राहणार, अशी घणाघाती द्धव ठाकरेंनी केला.

‘कावळ्याच्या शापानं गुरं मरत नाही’; भावासाठी बहिण मैदानात, चंद्रकात पाटलांना उत्तर 

बुलढाणा येथील मेहकर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलतांना उद्धव ठाकरेंनी भाजपच्या दुटप्पी पणावर जोरदार टीका केली भाडोत्री जनता पक्षात गेलेले, मिंधे अजित पवारांना पैसे देऊन माणसं बोलवावी लागतात, तरी माणसं जमत नाहीत. बिर्याणीची सोय करावी लागते, लोक येऊन बिर्याणी खातात आणि रिकाम्या खुर्च्यासमोर येऊन हे भाषण ठोकून बिर्याणी खायला जातात. हे लोक म्हणतात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. पण, गोमांसाचे कत्तलखाने चालवणाऱ्या कंपन्यांकडून तुम्ही निवडणूक रोखे घेऊन आम्हाला हिंदुत्व शिकवणार असाल तर या निवडणुकीत जनता तुम्हाला कापल्याशिवाय राहणार नाही. कापावचं लागेल. कारण हे थोतांड आहे, असं ठाकरे म्हणाले.

भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात गाशा गुंडाळला… माणिक कदम यांच्यासह अनेक नेते राष्ट्रवादीत 

हिंदुत्व हिंदुत्व म्हणणाऱ्यांचा आणि देशप्रेम म्हणणाऱ्यांचा इतिहास आम्ही काढू शकतो. कधीही स्वातंत्र्यलढ्यात भाजप काय, पण त्याचे राजकीय बापजादे जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच नव्हते, अशी टीकाही ठाकरेंनी केली.

शिवसैनिक गद्दारांना गाडून टाकतील
ज्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांना तुम्हाला निवडून दिलं, त्यांच्यावर तुम्ही खोट्या केसेस दाखल करता, फक्त थोडे दिवस थांबा… तुमच्याकडे प्रचंड धनसंपत्ती आहे, पण माझ्याकडे जनसंपत्ती आहे. ज्या गद्दारांना शिवसैनिकांनी आमदार, खासदार केले त्यांना आता माझे शिवसैनिक गाडून टाकतील, असेही ते म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज