भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात गाशा गुंडाळला… माणिक कदम यांच्यासह अनेक नेते राष्ट्रवादीत

भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात गाशा गुंडाळला… माणिक कदम यांच्यासह अनेक नेते राष्ट्रवादीत

मुंबई : भारत राष्ट्र समिती (BRS) चे शेतकरी युनिटचे महाराष्ट्राचे प्रमुख माणिक कदम यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत देवगिरी शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यानंतर कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल राज्यप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, या पक्षप्रवेशानंतर महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीने गाशा गुंडाळला आहे. (Many leaders, including Manik Kadam, head of the Bharat Rashtra Samiti (BRS) farmers’ unit in Maharashtra, have joined the NCP.)

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पराभव होण्यापूर्वी भारत राष्ट्र समितीने देशभर विस्ताराचे धोरण अवलंबिले होते. यात तेलंगणानंतर पक्षाने पहिले लक्ष्य महाराष्ट्रावर केंद्रीत केले होते. महाराष्ट्रातील लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवण्याचे नियोजन केले. अनेक नेत्यांनी, माजी आमदार-खासदारांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. सर्वच विधानसभा मतदार संघात समन्वयक नेमले. समन्वयकांना टॅब आणि अन्य साधन सामग्री पुरवण्यात आली.

सुनेत्रा पवार, शरद पवारांनंतर आता शिवतारेंचा डाव; पवारांचे विरोधक कुणाला देणार बारामतीचा ‘ताज’

याशिवाय राज्यात सुमारे 20 लाख 85 हजार पदसिद्ध पदाधिकाऱ्यांची नोंदणी पूर्ण केली. 17 हजार गावांमध्ये पदाधिकारी नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण केली. पदाधिकाऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2 ते 5 लाख रुपयांचा निधी वर्ग केला, राज्यात विभागनिहाय कार्यालय स्थापन करून पक्ष विस्ताराचे काम सुरु केले. सोलापूर, छत्रपती संभाजीनग आणि मराठवाडा, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये स्थानिक निवडणुकांमध्ये उतरण्यास सुरुवात केली.

Saroj Patil : पवारांच्या बहिणीने सांगितलं बारामतीचं तख्त कोण जिंकणार!

मात्र तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव होताच भारत राष्ट्र समितीचा तेलंगणासह महाराष्ट्रातही जोर ओसरल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीतही पक्षाला तेलंगणातच उमेदवार शोधावे लागत आहेत. अशात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पक्षाचे काम सुरु ठेवायचे आहे की बंद करायचे आहे? असा सवाल करत भारत राष्ट्र समितीच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना पत्र लिहिले होते. आता अखेरीस माणिक कदम यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेस केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube