Taiwan Earthquake : इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या, तैवानमध्ये शक्तिशाली भूकंप

  • Written By: Last Updated:
Taiwan Earthquake : इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या, तैवानमध्ये शक्तिशाली भूकंप

Taiwan Earthquake : आज सकाळी तैवानची (Taiwan) राजधानी तैपेई (Taipei) येथे भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले. यानंतर आता तैवानच्या केंद्रीय हवामान प्रशासनाने त्सुनामीचा इशारा देखील दिला आहे. या शक्तिशाली भूकंपामुळे शहरात अनेक इमारती कोसळल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मोठी बातमी, छत्रपती संभाजीनगरात कपड्याच्या दुकानाला आग, 7 जणांचा मृत्यू

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. तर भूकंपामुळे जीवित वा मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या भूकंपानंतर जपान हवामान संस्थेने (Japan Meteorological Agency) 3 मीटर (9.8 फूट) पर्यंत सुनामी येण्याची शक्यता वर्तवली आहे. भूकंपामुळे शहरातील इमारतींचा पाया हादरला आहे.तर रेल्वे सेवाही बंद करण्यात आली आहे. माहितीनुसार, तैवानमध्ये हा सर्वात शक्तीशाली भूकंप होता.

OnePlus Nord CE4 भारतात लॉन्च! मिळणार जबरदस्त फीचर्ससह पावरफुल बॅटरी; खर्च होणार फक्त ‘इतके’ पैसे

या भूकंपाची तीव्रता 7.4 मोजली गेली असून स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी 7:58  वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू हुआलियन (Hualien) शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर रामदेव बाबांनी मागितली माफी, माघार घेत, म्हणाले …

हवामान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तैवानमध्ये 1999 नंतरची ही सर्वात मोठी भूकंपाची घटना आहे. या भूकंपानंतर हुआलियनने बुधवारी कार्यालये आणि शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज