Taiwan Earthquake : एकाच रात्रीत भूकंपाचे तब्बल 80 धक्के; एका बाजूला झुकल्या इमारती

Taiwan Earthquake : एकाच रात्रीत भूकंपाचे तब्बल 80 धक्के; एका बाजूला झुकल्या इमारती

Taiwan Earthquake : आशिया खंडातील देशात मागील काही दिवसांपासून सातत्याने (Taiwan Earthquake) भूकंप होत आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तैवानमध्ये मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या देशात भूकंपाचे धक्के बसले आहेत. विशेष म्हणजे येथे एकाच रात्रीत तब्बल 80 धक्के जाणवले. यामध्ये सर्वात शक्तिशाली भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपानंतर आधीच्या भूकंपात झुकलेल्या इमारती आणखी झुकल्या आहेत. एकाच रात्रीत इतक्या वेळेस भूकंपाचे धक्के जाणवल्याने येथील नागरिकांत प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. आधीच्या भूकंपातून सावरत असतानाच पुन्हा भूकंप झाला आहे.

Taiwan Earthquake : तैवानच्या भूकंपात 9 जणांचा मुत्यू, 70 जण अडकले, दोन भारतीय बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू ग्रामीण पूर्वी काउंटी हुलिएन या भागात होता. याच भागात 3 एप्रिल रोजी 7.2 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपात 14 लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर पुन्हा तैवानमध्ये शक्तिशाली भूकंपाचे अनेक धक्के बसले आहेत. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की 3 एप्रिलला झालेल्या भूकंपात एका हॉटेलाचे मोठे नुकसान झाले होते. काल रात्री झालेल्या या हॉटेलची इमारत आणखी झुकली आहे. हॉटेल सध्या बंद पडलेले आहे.

भूकंप का होतात?

पृथ्वीच्या आतील प्लेट्स एकमेकांवर आदळल्याने भूकंप होतो. पृथ्वी 12 टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्स एकमेकांना आदळल्यास जी ऊर्जा बाहेर पडते त्यालाच भूकंप असे म्हणतात. या प्लेट्स भूगर्भात अत्यंत कमी गतीने सरकत असतात. वर्षाच्या हिशोबात सांगायचे झाले तर या प्लेट्स दरवर्षी त्यांच्या जागेवरून 4 ते 5 मिमी सरकतात. या काळात हालचाली होताना प्लेट्स एकमेकांवर आदळण्याचे प्रकारही घडतात. असे जर झाले तर आपल्याकडे भूकंप येतो, असे तज्ज्ञ सांगतात. याआधी नेपाळ आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. दिल्ली एनसीआरसह उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भूकंप झाला. येथील नागरिक भीतीपोटी घराबाहेर पळाले. या भूकंपात मात्र कोणतेही नुकसान झाले नाही.

Earthquake : लद्दाख हादरलं! भल्या पहाटे भूकंपाचे धक्के, भीतीने नागरिकांची उडाली गाळण

कशी मोजली जाते भूकंपाची तीव्रता ?

भूकंप रिश्टर स्केलवर मोजला जातो. रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एक गणितीय परिमाण आहे. याला रिक्टर मॅग्निट्यूड टेस्ट देखील म्हटले जाते. रिक्टर स्केलवर भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणजेच एपीसेंटरपासून 1 ते 9 पर्यंत आधारावर मोजले जाते. हे स्केल भूकंपादरम्यान जमिनीतून निघालेल्या ऊर्जेच्या आधारावर तीव्रतेचे मोजमाप करते.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube