Earthquake : लद्दाख हादरलं! भल्या पहाटे भूकंपाचे धक्के, भीतीने नागरिकांची उडाली गाळण

Earthquake : लद्दाख हादरलं! भल्या पहाटे भूकंपाचे धक्के, भीतीने नागरिकांची उडाली गाळण

Earthquake News : उत्तर भारतात भुकंपाच्या घटना सातत्याने घडत (Earthquake) आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश, चीन या देशांतही मागील काही दिवसांत सातत्याने भूकंप झाले आहेत. त्यानंतर आज पुन्हा एकदा उत्तर भारतातील लेह लद्दाख भूकंपाने हादरले. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 इतकी मोजली गेली. तसे पाहिले तर हा भूकंप सौम्य होता. तरीदेखील लोकांची भीतीने गाळण उडाली.

काही सेकंदापर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवत होते. मात्र यामुळे कोणतीही जीवित वा वित्त हानी झाली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू लेह आणि लडाखमध्ये होता. जमिनीच्या आत पाच किलोमीटर खोलीवर भूकंप झाला. त्यामुळे या भूकंपाची तीव्रता जास्त नव्हती तरीदेखील नागरिक भीतीने घराबाहेर पळाले.

China Earthquake : चीनमध्ये दुसऱ्या दिवशीही शक्तिशाली भूकंप; घरांची पडझड, नागरिकांची पळापळ

दरम्यान, याआधी मागील सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारताची राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात (Earthquake in Delhi) जोरदार भूकंपाचे धक्के बसले होते. अचानक झालेल्या या भूकंपाने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोक भीतीने घराबाहेर पळत सुटले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ-चीन सीमेजवळ होता. या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपामुळे भारतात कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही. यानंतर लडाखमध्ये भूकंप झाला. मात्र हा भूकंप दिल्लीतील भूकंपाच्या तुलनेत सौम्य होता. त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. घरांची पडझड झाल्याचीही माहिती नाही. तरीदेखील काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

भूकंप का होतात?

पृथ्वीच्या आतील प्लेट्स एकमेकांवर आदळल्याने भूकंप होतो. पृथ्वी 12 टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्स एकमेकांना आदळल्यास जी ऊर्जा बाहेर पडते त्यालाच भूकंप असे म्हणतात. या प्लेट्स भूगर्भात अत्यंत कमी गतीने सरकत असतात. वर्षाच्या हिशोबात सांगायचे झाले तर या प्लेट्स दरवर्षी त्यांच्या जागेवरून 4 ते 5 मिमी सरकतात. या काळात हालचाली होताना प्लेट्स एकमेकांवर आदळण्याचे प्रकारही घडतात. असे जर झाले तर आपल्याकडे भूकंप येतो, असे तज्ज्ञ सांगतात. याआधी नेपाळ आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. दिल्ली एनसीआरसह उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भूकंप झाला. येथील नागरिक भीतीपोटी घराबाहेर पळाले. या भूकंपात मात्र कोणतेही नुकसान झाले नाही.

Earthquake : उत्तर भारतात भूकंप! दिल्लीसह पंजाब, हरयाणा हादरला, लोकांची पळापळ

follow us
  • fb
  • instagram
  • youtube