Earthquake : उत्तर भारतात भूकंप! दिल्लीसह पंजाब, हरयाणा हादरला, लोकांची पळापळ
Earthquake in Delhi : देशाची राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास (Earthquake in Delhi) जोरदार भूकंपाचे धक्के बसले. अचानक झालेल्या या भूकंपाने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोक भीतीने घराबाहेर पळत सुटले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ-चीन सीमेजवळ होता. या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपामुळे भारतात कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाल्याची माहिती नाही.
सोमवारी रात्री झालेल्या या भूकंपाचे धक्क्यांनी परिसर हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या भागात मागील काही दिवसांपासून सातत्याने भूकंप होत आहेत. अचानक धक्के बसू लागल्याने लोक भीतीने घराबाहेर आले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू चीनच्या शिनजियांग भागात 80 किलोमीटर खोल होता. हा भूकंप इतका शक्तिशाली होता की त्याचा परिणाम भारतातही जाणवला. राजधानी दिल्लीसह हिमाचल प्रदेश, हरियाणा, नवी दिल्ली या राज्यांत भूकंपाचे धक्के जाणवले.
जोरदार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली राजधानी; रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रतेची नोंद
भूकंप का होतात?
पृथ्वीच्या आतील प्लेट्स एकमेकांवर आदळल्याने भूकंप होतो. पृथ्वी 12 टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्स एकमेकांना आदळल्यास जी ऊर्जा बाहेर पडते त्यालाच भूकंप असे म्हणतात. या प्लेट्स भूगर्भात अत्यंत कमी गतीने सरकत असतात. वर्षाच्या हिशोबात सांगायचे झाले तर या प्लेट्स दरवर्षी त्यांच्या जागेवरून 4 ते 5 मिमी सरकतात. या काळात हालचाली होताना प्लेट्स एकमेकांवर आदळण्याचे प्रकारही घडतात. असे जर झाले तर आपल्याकडे भूकंप येतो, असे तज्ज्ञ सांगतात. याआधी नेपाळ आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. दिल्ली एनसीआरसह उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भूकंप झाला. येथील नागरिक भीतीपोटी घराबाहेर पळाले. या भूकंपात मात्र कोणतेही नुकसान झाले नाही.