शेतकऱ्यांवर अन्याय , पुन्हा ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचा आयोजन करा, अमर काळेंचं थेट मोदींना आव्हान

शेतकऱ्यांवर अन्याय , पुन्हा ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचा आयोजन करा, अमर काळेंचं थेट मोदींना आव्हान

Amar Kale : संसदेचा सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशात बोलताना वर्धाचे खासदार अमर काळे (MP Amar Kale) यांनी आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच पुन्हा एकदा यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाचा आयोजन करावे आणि देशातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही गेल्या 11 वर्षात काय? केला आहे याचा उत्तर द्यावा असा आव्हान देखील त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.

आपल्या भाषणात बोलताना अमर काळे म्हणाले की, केंद्र सरकारने 2010 आणि 2011 च्या बजेटमध्ये कृषीसाठी 11 टक्के तरदूत केली होती तर 2019 आणि 2020 च्या बजेटमध्ये 9.5 टक्के तरदूत करण्यात आली होती मात्र यावेळी जाहीर करण्यात आलेल्या 2024-25 च्या बजेटमध्ये केंद्र सरकारने फक्त 3.15 टक्क्यांची तरदूत केली आहे. त्यामुळे हा बजेट देशातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. अशी टीका वर्धाचे खासदार अमर काळे यांनी केली.

पुढे बोलताना अमर काळे म्हणाले की, काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात विदर्भात आत्महत्या होत होत्या आणि त्यावेळी 20 मार्च 2014 मध्ये आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये आले होते आणि त्यांनी यवतमाळमध्ये ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमात मोदींनी हा देश कृषिप्रधान देश आहे असं देशाच्या शेतकऱ्यांना सांगितले होते.

आज सरकार ‘जय जवान जय किसानचा’ नारा देते मात्र जितके सैनिक सीमेवर शहीद होत नाही त्यापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यामुळे ही परिस्थिती जेव्हा पर्यंत मी बदलणार नाही तेव्हा पर्यंत मी शांत बसणार नाही असं नरेंद्र मोदी म्हणाले होते. तसेच त्यावेळी मोदींनी शेतकऱ्यांना सांगितले होते की, आम्ही तुमच्या उत्पन्नावर आधारित हमीभाव देऊ, तुमचे उत्त्पन्न डबल करू, स्वामीनाथन आयोगाचे शिफारशी आम्ही लागू करू असं देखील नरेंद्र मोदींनी आम्हाला सांगितले होते.

मात्र 20 मार्च 2025 ला मोदींच्या या घोषणेला 11 वर्ष पूर्ण होणार आहे. मी त्यांना आव्हान करतो यावेळी देखील त्यांनी यवतमाळमध्ये ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचा आयोजन करावा आणि तुमच्या सरकारने गेल्या 11 वर्षात देशातील शेतकऱ्यांसाठी काय – काय ? केला आहे याची माहिती द्यावी.

BSNL ला सरकारकडून पाठिंबा, ‘या’ शहरांमध्ये 5G साठी ट्रायल, Jio, Airtel ला मोठा धक्का ?

आज देखील देशात, महाराष्ट्रात शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे. त्यामुळे देश आणि देशातील शेतकरी तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा करत आहे असं देखील आपल्या भाषणात वर्धाचे खासदार अमर काळे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube