‘…त्याबद्दल शरद पवारांविषयी मी कृतज्ञ’; वर्धापन दिनाच्या भाषणात अजितदादा भावूक

‘…त्याबद्दल शरद पवारांविषयी मी कृतज्ञ’; वर्धापन दिनाच्या भाषणात अजितदादा भावूक

Ajit Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवारांमधील संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला. अनेकदा अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार टीकाही केली होती. बारामती मतदारसंघ हातातून गेल्यानंतर हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता असतांना मात्र, आअजित पवारांनी शरद पवारांविषयी (Sharad Pawar) कृतज्ञता व्यक्त केली.

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात धनुभाऊ काय बोलून गेले; माझ्या एका डोळ्यातील आश्रू पंकजांसाठी नव्हे तर… 

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा वर्धापन दिन साजरा होत आहे. या मेळाव्यात बोलतांना राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार म्हणाले की, गेली 24 वर्ष शरद पवार पक्षाचे जे नेतृत्व केलं, त्याबद्दल आज मी पक्षाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो. यासह पक्षाच्या यशात संगमा यांच्यासारख्या अनेक नेत्यांचे योगदान आहे, त्या सर्वांचेही मी आभार मानतो, असं अजित पवार म्हणाले. यावेळी शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

ही पण मते गेली आणि ती पण ; प्रचार सभांना न बोलविण्याचे शल्य भुजबळांनी जाहीरपणे बोलून दाखविले 

पुढं बोलतांना अजित पवार म्हणाले, 25 वर्षांपूर्वी सोनिया गांधी यांच्या परदेशी असण्याचा मुद्द्यावरून कॉंग्रेस पक्षाशी फारकत घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी भुजबळ साहेबांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून आक्रमक प्रचार करत महाराष्ट्र पिंजून काढला होता. पण त्यावेळी राज्यात काँग्रेसकडे नेतृत्व नसूनही त्यांच्या 75 जागा आल्या. आणि आपल्याला फक्त 58 जागा मिळाल्या होत्या, असंही अजित पवार म्हणाले.

ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भातील अनेकांचे अंदाज चुकले. आपण लढण्याचा चांगला प्रयत्न केला. मात्र, आपल्याला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. या पराभवानंतर पक्षात एकमेकांविषयी नाराजी असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, मंत्रिपदावरून किंवा पराभवावरून पक्षात कोणतीही नाराजी नाही, असं म्हणत एनडीचं सरकार पाच वर्ष टिकेल, असंही अजित पवार म्हणाले.

तटकरेंनी लाज राखली…
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडची जागा राखण्यात आपल्याला यश मिळालं. सुनील तटकरें तेथून खासदार झाले. आपली एकतरी जागा निवडून आली, रायदडमध्ये तटकरे साहेबांनी आपली लाज राखली, त्याबद्दल त्यांचं आभार आणि अभिनंदन, असंही अजित पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज