…आता पुढची तयारी; अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनीच सांगितली रणनिती

…आता पुढची तयारी; अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनीच सांगितली रणनिती

NCP  25 Anniversary : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आज २५वा वर्धापन दिन आहे. त्या निमीत्ताने अजित पवारांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, लोकसभेचा निकाल बघितला आहे. (NCP)  कुठं कमी पडलो, हे विचारात घेऊन पुढची तयारी करायची आहे. (Ajit Pawar) तरूणांचे नेतृत्व उभं करायचं आहे, अशी रणनिती अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनीच सांगितली आहे. तसंच, कार्यकर्ता हा संघटनेचा कणा आहे. तरूण चेहऱ्यांना संधी देणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत.

NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा ? ‘या’ महिन्यात होणार सुनावणी

शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेनुसार काम सुरू असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. काल दिल्लीत मोदींनी शपथ घेतली आहे. धिरज शर्मा हे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख असतील, ते झेंडावंदन करतील अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. माझी भुमिका मी दुपारी कार्यक्रमात स्पष्ट करेल, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसंच, मंत्रालयात राज्यातील मान्सूनचा तयारी आढावा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

काळवेळ कोणासाठी थांबत नाही. २५ वर्ष पुर्ण झाली आहेत. जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. लोकसभेचा निकाल बघितला आहे. कुठं कमी पडलो, हे विचारात घेऊन पुढची तयारी करायची आहे. तरूणांचे नेतृत्व उभे करायचे आहे. तरूण चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन सायन येथील षण्मुखानंद सभागृहात साजरा केला जात आहे. यासाठी अजित पवार गटाने जय्यत तयारी केलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर वर्धापन दिनामध्ये अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे. आजच्या वर्धापनदिनासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचं कार्यालय फुलांनी सजवलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज