ही पण मते गेली आणि ती पण ; प्रचार सभांना न बोलविण्याचे शल्य भुजबळांनी जाहीरपणे बोलून दाखविले

  • Written By: Published:
ही पण मते गेली आणि ती पण ; प्रचार सभांना न बोलविण्याचे शल्य भुजबळांनी जाहीरपणे बोलून दाखविले

मुंबईः अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) रौप्यमहोत्सवी स्थापना दिनाचा कार्यक्रम आज मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha election) उमेदवारांच्या प्रचारसभेला न बोलविण्याचे शल्य जाहीरपणे बोलून दाखविले आहे. काही जणांचे मते मिळणार नाहीत, म्हणून मला सभेला बोलविले नाही. माझा फोटोही बॅनरवर उमेदवारांनी लावले नाहीत. परंतु निवडणुकीत हेही मते गेली आणि ती पण मते गेली, असे भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

NCP Foundation Day : बारामतीची सहानभुती, सर्दी-पडसं अन् धनुभाऊंची पायाची शपथ; काय घडलं?

भुजबळ म्हणाले, मराठा आणि ओबीसी समाज हा वाद नाही. मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. ते टिकणारे आरक्षण आहे. हे मराठा समाजाला समजून सांगितले पाहिजे.उमेदवार हे ओबीसी आणि मराठा वादामुळे पडलो आहेत, हे समजू नका. तिकडे विदर्भात तो वाद नव्हता. दोन-तीन मतदारसंघाच हा वाद धुसफूसत होता. या लोकसभेला मला कमी भाषणे करण्याची संधी मिळाली आहे. मते मिळणार नाहीत म्हणून मला प्रचार सभेला बोलविले नाही. माझे फोटोही बॅनर्सवर छापले नाहीत. पण ही पण मते गेली आणि ती मते गेली, असे भुजबळ म्हणाले. उमेदवारांना मराठाही मते मिळाली नाहीत आणि ओबीसी मते मिळाली नाहीत, असा भुजबळ यांच्या भाषणाच अर्थ निघतो. म्हणजेच या लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाजही महायुतीवर नाराज होता, असा अर्थ भुजबळांच्या भाषणातून निघतो आहे.


अजितदादांसाठी तटकरे पवारांना भिडले; भर कार्यक्रमात विचारला थेट प्रश्न

लोकसभा निवडणुकीत महायुतीला ठेच लागली आहे. हे नाकारून चालत नाही. आता पुढे ठेच लागणार नाही हे पाहिजे. दगडधोंडे बाजूला काढले पाहिजे, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.

महायुतीला भुजबळांनी आरसा दाखविला
मुंबईत कोट्यवधींचे विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे महायुतीचे मुंबईतील सर्व उमेदवार निवडून येतील, असे वाटत होते. परंतु पियूष गोयल आणि रवींद्र वायकर हे निवडून आले आहेत. वायकर हे केवळ 48 मतांनी निवडून आले आहेत. शेवटी दोन मोठे समाज आपल्याला सोडून गेले आहेत. मुस्लिम, दलित समजाबरोबर आदिवासी समाज हे आपल्याला सोडून गेले आहेत. आजार ओळखून औषध दिले तर यश आपले आहे. विकास करायला पाहिजे. मुस्लिमांबाबत हे करणार आहे, असे बोलून दुखावले आहे. संविधान बदलण्याचा प्रचार झाला आहे. चारशेपार म्हणाल्याने दोन मोठे समाज बाजूला गेले. आदिवासी समाज बाजूला गेला आहे. संविधान बदलणे म्हणजे आरक्षण जाणार हे डोक्यात गेले. तेच आदिवासींच्या डोक्यात गेले आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीत तो प्रश्न संपला आहे. विधानसभेला दलित, मुस्लिम, ओबीसी, मराठा मतदार परत मिळवावा लागणार, असे भुजबळ म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज