लोकसभा निवडणुकीत तीन कट्टरपंथी विजयी : इंदिरा गांधींच्या मारकेऱ्याचा मुलगा बनला ‘खासदार’

लोकसभा निवडणुकीत तीन कट्टरपंथी विजयी : इंदिरा गांधींच्या मारकेऱ्याचा मुलगा बनला ‘खासदार’

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पंजाब आणि जम्मू-कश्मीरमधील तीन कट्टरपंथींचा विजय झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी बेअंतसिंह याचा मुलगा सरबजीत सिंग, खलिस्तानवादी ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा नेता आणि आसाममधील दिब्रुगढ कारागृहात बंद असलेला अमृतपाल सिंग, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कृत्ये करणाऱ्या संघटनेला आर्थिक मदत केल्याचा आरोपात तुरुंगात असलेला अब्दुल रशीद शेख हे तिघेही लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. (Three hardliners have won the Lok Sabha elections in Punjab and Jammu and Kashmir.)

सरबजीत सिंगचा 70 हजार मतांनी विजय :

सरबजीतसिंग खालसा यांनी फरीदकोट मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत 70 हजार 053 मतांनी विजय संपादन केला. सरबजीतसिंग यांना 2 लाख 98 हजार 062 मते मिळाली. तर आम आदमी पक्षाचे करमजीत सिंग अनमोल दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना 2 लाख 28 हजार 009 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या अमरजीत कौर साहोके यांना 1 लाख 60 हजार 357 मते मिळाली.

खेळाडू अन् पैलवानांच्या राज्यात रिव्हर्स गिअर; कोणत्या मुद्द्यांनी बिघडला भाजपचा खेळ

सरबजीत सिंग खालसा हा बेअंत सिंगचा मुलगा :

सरबजीत सिंग खालसा हा बेअंत सिंगचा मुलगा आहे. बेअंत सिंग आणि सतवंत सिंग हे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अंगरक्षक होते. 1984 मध्ये या दोघांनी इंदिरा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यादरम्यान सुरक्षारक्षकांनी बेअंत सिंगला जागीच ठार केले होते. तर सतवंत सिंग याला अटक केली होती. 1989 मध्ये सतवंत आणि या हत्येचा मुख्य सूत्रधार केहर सिंग याला दिल्लीच्या तिहार तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली होती.

अमृतपालसिंहला पंजाबमधील सर्वाधिक मताधिक्य :

पंजाबमधील खडूर साहिब या प्रसिद्ध लोकसभा मतदारसंघातून ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा नेता अमृतपाल सिंग याने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्याच्या विजयाने पंजाबच्या राजकीय वर्तुळात नवीन चर्चेला उधाण आले आहे. अमृतपाल सिंग त्याच्या साथीदारांसह सध्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत आसाममधील दिब्रुगड कारागृहात आहे.

Video : चार वेळा वदवून सांगितलं सोबत राहू; ‘पलटू पंटर’ नितीश कुमारांनी गाजवली NDA ची बैठक

अमृतपाल सिंग यांच्या विजयाची बातमी मिळताच खडूर साहिबमधील लोकांनी मतमोजणी केंद्राबाहेर मोठी गर्दी केली होती. त्याच्या विजयानंतर मतदारसंघातील अनेक गावांतील गुरुद्वारांमध्येही लंगरची व्यवस्था करण्यात आली होती. अमृतपाल सिंगला खडूर साहिब मतदारसंघातून 4 लाख 4 हजार 430 मते मिळाली. त्यांनी एक लाख 97 हजार 200 मतांनी विजय साकारला. पंजाबमधील लोकसभा जागांवर कोणत्याही उमेदवाराने नोंदवलेला हा सर्वात मोठा विजय आहे.

अब्दुल रशीद शेख विजयी :

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघातून तुरुंगात असलेला अब्दुल रशीद शेख विजयी झाला आहे. त्याने राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. अब्दुल रशीद शेख हा सध्या तिहार तुरुंगात आहे. त्याच्यावर काश्मीरमधील दहशतवादी कृत्ये करणाऱ्या संघटनेला आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे. तुरुंगात असताना त्यांनी निवडणूक लढवली. शेख हे अवामी इत्तेहाद पक्षाचे प्रमुखही आहेत. रशीद शेख 2008 आणि 2014 मध्ये लंगेट विधानसभा मतदारसंघातून आमदारही राहिले आहेत. 2019 ची लोकसभा निवडणूकही त्यांनी लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज