खेळाडू अन् पैलवानांच्या राज्यात रिव्हर्स गिअर; कोणत्या मुद्द्यांनी बिघडला भाजपचा खेळ
Loksabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीत बहुमताचा दावा करणाऱ्या भाजपला (Lok Sabha Election Results) मोठा झटका बसला आहे. इंडिया आघाडीने जोरदार टक्कर दिल्याने भाजपला फक्त 240 जागा मिळाल्या तर एनडीए आघाडीला 292 जागांवरच समाधान मानावे लागले. यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या राज्यांत जास्त जागा मिळण्याची शक्यता होती तिथेच भाजपला मोठा फटका बसला. सर्वाधिक नुकसान उत्तर प्रदेशमध्ये झाले. महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यात भाजपच्या जागा कमी झाल्या. इतकेच नाही तर हरयाणा सारख्या लहान राज्यानेही भाजपाच्या डोकेदुखीत वाढ केली.
मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने हरियाणात सर्व दहा जागा जिंकल्या होत्या. पण या निवडणुकीत हरयाणाने भाजपला अपेक्षित साथ दिली नाही. त्यातच आता ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपने काही दिवसांपूर्वी जेजेपी बरोबरील आघाडी तोडली होती. मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्री केले.
या घडामोडी करत भाजपने राज्यात नवी आखणी केली तरी लोकसभा निवडणुकीत इतका मोठा झटका पक्षाला कसा बसला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपच्या फक्त जागाच कमी झाल्या नाहीत तर व्होट शेअर 58 टक्क्यांवरून 46 टक्क्यांपर्यंत खाली आला. दुसरीकडे काँग्रेसचा व्होट शेअर 28 टक्क्यांवरून थेट 43 टक्क्यांपर्यंत वाढला.
काँग्रेसची सावध, तृणमूल अन् ठाकरे सत्तेसाठी उत्सुक; काय घडतंय इंडियाच्या गोटात?
भाजपमधील सूत्रांच म्हणणं आहे की या निवडणुका पक्षासाठी रेड अलर्ट आहेत. आता पक्षापासून दूर गेलेल्या मतदारांना पुन्हा परत आणण्यासाठी पक्षाला प्रचार मोहीलेमा नव्याने धार देण्याची गरज आहे असे राजकीय जाणकार सांगतात. निवडणुकीत जागा कमी झाल्याचं टेन्शन भाजपला आहेच त्याशिवाय आणखीही काळजीत टाकणाऱ्या गोष्टी आहेत. यात महत्त्वाचं म्हणजे 2019 मध्येही अडचणी वाढल्या होत्या आणि सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला जेजेपी पार्टीची मदत घ्यावी लागली होती. पक्षाची अवस्था 2019 सारखी किंवा त्यापेक्षा अधिक खराब तर होणार नाही ना याची काळजी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आहे.
2019 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने 40 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसनेही चांगले प्रदर्शन करत 31 जागा जिंकल्या होत्या. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला जेजेपीचा पाठिंबा घ्यावा लागला होता. आता भाजपच्या मदतीला जेजेपी नाही. तसेच मागील महिन्यात तीन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळे काँग्रेस सातत्याने फ्लोर टेस्ट घेण्याची मागणी करत आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात पाच जागा जिंकल्याने पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की अंबाला आणि सिरसा या दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या अडचणी, खराब झालेली कायदा सुव्यवस्था या मुद्द्यांवर आगामी काळात सरकारला जाब विचारणार असल्याचे या नेत्याने सांगितले.
मोदींची एकमताने NDA च्या नेतेपदी निवड; चंद्राबाबू-नितीश यांनी केलं तोंडभरून कौतुक
भाजपला राज्यात नुकसान का झाले यामागे काय कारणे आहेत याचा शोध भाजप नेत्यांकडून घेतला जात आहे. पण यामागे 2020 मध्ये झालेले शेतकरी आंदोलनही आहे. या आंदोलनाकडे केंद्र सरकारने पूर्ण दुर्लक्ष केले होते. शेतकऱ्यां बरोबर सरकारची वागणुक सुद्धा योग्य नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष धुमसत होता. नंतर हा राग शेतकऱ्यांनी मतदानातून व्यक्त केल्याने भाजपला मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.
तसेच हरियाणातील महिला पैलवानानी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाने चांगलाच जोर धरला होता याचाही फटका भाजपाला बसल्याची चर्चा आहे. हरयाणा सरकारच्या योजनांवर विरोधकांनी सातत्याने टीका केली त्याचाही परिणाम मतदारांवर झाला. त्यामुळे