मोदींची एकमताने NDA च्या नेतेपदी निवड; चंद्राबाबू-नितीश यांनी केलं तोंडभरून कौतुक
NDA Alliance Meeting : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळालं आहे. यानंतर एनडीएने सरकार स्थापनेच्या दृष्टीने हालाचाली सुरू केल्या आहेत. आज संसदेत एनडीएतील सर्व घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आघााडीच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला नितीन गडकरी, टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, जेडीयू प्रमुख नितीश कुमार, जनसेना प्रमुख पवन कल्याण, लोजपा प्रमुख चिराग पासवान, शिवेसनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, हमचे जीतनराम मांझी यांनी अनुमोदन दिले. नरेंद्र मोदी यांच्या नावाला पाठिंबा दिला. यानंतर भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी काळात सरकारचा रोडमॅप सादर केला. तसेच आगामी काळात वेळ वाया न घालवता विकासाच्या कामांवर भर देणार असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
आगामी काळात गुड गव्हर्नन्स काय असतं हे दाखवून देणार. विकसित भारताचं स्वप्न साकार करू. सदनात कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी असला तरी तो माझ्यासाठी एक सारखाच असेल. याच कारणामुळे एनडीए आघाडी मजबुतीने वाटचाल करत आहे. भेदभाव नाही. त्यामुळेच जनतेचा विश्वास आम्ही जिंकला. एनडीए हा भारताचा आत्मा आहे. पुढील दहा वर्षात विकासाचा नवा अध्याय आम्ही रचणार आहोत.
Election Result : सहा राज्यांनी घेतली भाजपाची शाळा; राजधानी दिल्लीची ‘वाट’ही केली अवघड
या निवडणुकीत दक्षिण भारतात एनडीएने नव्या राजकारणाचा पाया टाकला आहे. येथील राज्यात लोकांनी एनडीएचं स्वागत केलं. तामिळनाडूच्या दलाचं मी विशेष कौतुक करू इच्छितो. तेथील कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं. आज या राज्यात एनडीएचा व्होट शेअर वाढला आहे. केरळात आमच्या कार्यकर्त्यांवर खूप अत्याचार झाले. पण आज त्याच केरळात पहिला विजय मिळालाय. तेथून आमचा पहिला प्रतिनिधी संसदेत आलाय.
ईव्हीएमचा उल्लेख करत विरोधकांवर हल्लाबोल
मला तर वाटत होतं की आता विरोधक ईव्हीएमची अंत्यसंस्कार करण्याचीच तयारी करत आहेत. पण याच ईव्हीएमने या लोकांची तोंडं बंद केली. यांनी निवडणूक आयोगावर प्रचंड टीका केली. न्यायालयात गेले. कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला गेला. हा त्यांच्या षडयंत्राचा भाग होता. त्यांचा ईव्हीएम विरोध म्हणजे हे लोक जुन्या विचारांचं प्रतिनिधीत्व करतात असं मी मानतो. निवडणूक निकालाच्या काळात देशात हिंसाचार घडवण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला होता. लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न या लोकांंनी केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
पुढल्या दहा वर्षांतही काँग्रेस शंभरी गाठणार नाही
न हम हारे थे न हम हारे है असा शब्द उच्चारत मोदींनी विरोधकांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. मोदी पुढे म्हणाले, चार तारखेनंतर आमचं जे वागणं होतं त्यातून हे दिसत होतं की आम्ही विजय सुद्धा पचवू शकतो. पराजित झालेल्यांची थट्टा करण्याची विकृती आम्ही ठेवत नाही असे संस्कार आमच्यात नाहीत. दहा वर्षांनंतरही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आला नाही. मागील तीन निवडणुकीत त्यांना जितक्या जागा मिळाल्या नाहीत त्यापेक्षा जास्त जागा आम्हाला या निवडणुकीत मिळाल्या. दहा वर्षांनंतरही काँग्रेस शंंभरचा आकडा गाठणार नाही, असा खोचक टोला मोदींनी काँग्रेसला लगावला.
Elections Results : आम आदमीचा ‘चक्रव्यूह’ भेदत भाजपनं दिल्ली जिंकली; ‘हा’ प्लॅन ठरला किंगमेकर