टकाटक, फटाफट अन् M फॅक्टर.. विरोधकांना टोचला ‘NDA’चा प्रचार?

टकाटक, फटाफट अन् M फॅक्टर.. विरोधकांना टोचला ‘NDA’चा प्रचार?

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आले आहेत आता खऱ्या निकालाची (Lok Sabha Elections 2024) प्रतिक्षा आहे. हा निकालही उद्या लागणार आहे. एक्झिट पोलमध्ये भाजप नेतृत्वातील एनडीए आघाडीच विजयी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जर या पोल आणि निवडणूक निकालात फरक दिसला नाही तर विरोधकांसमोर प्रश्नांचा डोंगर उभा राहणार आहे. काँग्रेससाठी ही परिस्थिती जास्त आव्हानात्मक राहणार आहे.

काँग्रेस सहीत अन्य विरोधी पक्षांनी निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना अनेक प्रकारची आश्वासने दिली. आता या आश्वासनांचा किती परिणाम झाला याचं उत्तर उद्या मिळेल. मोदींनी प्रचारात दिलेली मोदी की गॅरंटी मतदारांना किती भावली याचंही उत्तर मिळेल. पण यावरून एक प्रश्न समोर येत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओळखण्यात, त्यांच्या प्रचाराच्या तंत्राला शह देण्यात विरोधक कमी पडले का.. निवडणुकीत खटाखट, फटाफट आणि काही दिवस अगोदर बिहारच्या जमिनीवरून सफाचट होण्याच्या गोष्टी केल्या गेल्या. मात्र एक्झिट पोलचा अंदाज आल्यानंतर सगळेच डावपेच उलटे पडल्याचे दिसत आहे.

टकाटक अन् बिहारमध्ये सफाचट

निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आघाडीचं नेतृत्व पीएम मोदी करत होते तर दुसरीकडे विरोधक होते पण त्यांचं नेतृत्व कोण करत होतं हे शेवटपर्यंत कळलं नाही. एनडीएकडे फक्त मोदींची गॅरंटी होती तर दुसरीकडे काँग्रेस, समाजवादी पार्टी, राजद, आम आदमी पार्टी, डीएमके पक्षांची वेगवेगळी आश्वासने. कुणी टकाटक पैसे खात्यात टाकण्याच्या गोष्टी करत होता, कुणी सीएए रद्द करण्याचे आश्वासन देत होता तर कुणी अख्ख्या देशात मोफत वीज देण्याचं वचन देत होता. अनेक पक्ष, अनेक आश्वासने अशी परिस्थिती झाली होती.

उत्तरेच्या पॉलिटिक्समधूनच दक्षिणचं ‘उत्तर’; भाजपाच्या ‘दक्षिण’ उदयाचा धक्का कुणाला?

या सगळ्या पक्षांनी आपापल्या व्होट बँकेचा विचार करून आश्वासनांची खैरात केली. आता एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर मोदींची गॅरंटी या सगळ्यांवर भारी पडत असल्याचे दिसत आहे. निवडणुकीत विरोधकांनी मेहनत घेतली नाही किंवा त्यांच्या नेत्यांच्या प्रचाराला गर्दी जमत नव्हती असे नाही. त्यांच्या स्टार प्रचारकांनी जोरदार प्रचार केला. सभांना लाखोंची गर्दीही जमली. तेजस्वी यादव, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अन्य विरोधी नेत्यांनी मोठ्या रॅली काढल्या, सभा घेतल्या. मग असं काय झालं की एक्झिट पोलचे थोडे सुद्धा त्यांच्या बाजूने जाताना दिसले नाहीत.

विरोधकांच्या बाबतीत जनतेच्या मनात सुरुवातीपासून हा प्रश्न होता की या विरोधी आघाडीचं नेतृत्व नेमकं कोण करत आहे. विरोधकांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की फक्त आश्वासने देऊन नंतर काय ते पाहिलं जाईल हा दृष्टिकोन ठेवून चालणार नाही. यामुळेच लोकांच्या मनात शंका निर्माण होते. काँग्रेसकडून महिलांसाठी अनेक आश्वासने देण्यात आली. आणखीही काही संभाव्य योजनांचा उल्लेख करण्यात आला. मात्र त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसले नाही.

सन 2014 आणि 2019 मधील एक्झिट पोल नंतर आता 2024 मध्येही अंदाज भाजपच्या बाजूने आला आहे. आता हा अंदाज निवडणूक निकालातही खरा ठरला तर एक गोष्ट स्पष्ट होईल की लोकांच्या मनात काहीच शंका नव्हती. देशातील जनता कोणत्याही किंतू परंतुच्या मुड मध्ये नव्हती. विरोधकांनी एकत्र येत इंडिया आघाडी तर तयार केली मात्र या आघाडीवर लोकांचा विश्वास काही बसत नव्हता. आता मंगळवारी काय निकाल लागतात याकडे देशातील जनतेचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मंगळसूत्राभोवती फिरला प्रचार

या निवडणुकीत प्रचारही चांगलाच रंगला होता. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात प्रचारही बदलताना दिसला. राजस्थान मधील एका प्रचार सभेत पीएम मोदींनी मंगळसूत्राचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. जर देशात काँग्रेसचं सरकार आलं तर प्रत्येकाच्या संपत्तीचा सर्वे केला जाईल. देशातील महिलांकडे किती सोनं आहे त्याची तपासणी केली जाईल आणि नंतर त्याचा हिशोब केला जाईल. पुढे ही संपत्ती सर्वांना सामान्य रूपात वितरीत केली जाईल. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून कुणाला तरी दिले जाईल. तुमची संपत्ती अशा प्रकारे जप्त करण्याचा अधिकार कुणाला आहे का? असा सवाल मोदींनी या सभेत विचारला होता.

K Annamalai : भाजपच्या चाणक्याला ‘बड्डे’ च्या दिवशीच मिळणार खासदारकीचं गिफ्ट

 

 

मुजरा करायचा तर खुशाल करा

बिहारच्या पाटलीपुत्र येथे 25 मे रोजी च्या सभेत बोलताना मोदी म्हणाले होते की इंडी आघाडीला त्यांच्या व्होट बँकेची गुलामी करायची आहे तर खुशाल करावी. त्यांना तिथे जाऊन मुजरा करायचा असेल तर तोही करावा पण मी नेहमीच एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाबरोबर उभा आहे असे मोदी म्हणाले होते.

श्रावणात मटण अन् मासे

काँग्रेस नेते राहुल गांधी ज्यावेळी बिहार मध्ये गेले होते त्यावेळी सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ते राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या बरोबर मटण बनवण्याची रेसिपी शिकताना दिसत होते. यावर पंतप्रधान मोदींनी जम्मू काश्मीरमधील एका रॅलीत राहुल गांधींवर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले कोर्टाने ज्यांना शिक्षा सुनावली. जे सध्या जामिनावर बाहेर आहेत अशा आरोपीच्या घरी जाऊन श्रावणाच्या महिन्यात मटण बनवण्याचा आनंद घेतला जात आहे आणि व्हिडिओ बनवून लोकांना डिवाचण्याचे काम केले जात आहे, अशी घणाघाती टीका मोदींनी प्रचारा दरम्यान केली होती. तेजस्वी यादव यांचाही मासे खातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.  यावरही प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस्वी यादव यांना घेरले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज