K Annamalai : भाजपच्या चाणक्याला ‘बड्डे’ च्या दिवशीच मिळणार खासदारकीचं गिफ्ट

  • Written By: Published:
K Annamalai : भाजपच्या चाणक्याला ‘बड्डे’ च्या दिवशीच मिळणार खासदारकीचं गिफ्ट

चेन्नई : लोकसभा निवडणुकीसाठी काल (दि.1) सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या. त्यानंतर संध्याकाळी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली. या भाजपला पुन्हा तिसऱ्यांदा सत्ता मिळणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे. या सर्व पोलमध्ये अधोरेखित होणारी गोष्ट म्हणजे भाजपसाठी अवघड वाटणारे दक्षिणेतील द्वार खुले झाले आहे. हे द्वार खुले करण्यासाठी मोदींचे ट्रम्प कार्ड असणाऱ्या के. अन्नामलाईंच्या (K Annamalai) चाणक्यानीती यशस्वी ठरल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. विशेष म्हणजे येत्या 4 जून रोजी अन्नामलाई यांचा वाढदिवस असून, याच दिवशी त्यांना खासदारकीची भेट मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Tamilnadu Lok Sabha Exit Poll K Annamalai)

राज्यात भाजपचं मोठा भाऊ, मुख्यमंत्रीही पत राखणार; या ‘एक्झिट पोल’ने पवार, काँग्रेसला धडकी भरवली

के. अन्नामलाई तामिळनाडूच्या राजकारणातील चाणक्य

तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे के. अन्नामलाई होय. वय वर्ष अवघे 39 वर्ष असणार हा तरूण नेता अन्नामलाई या नावाने अधिक ओळखला जातो. अन्नामलाई यांच्या नावाची चर्चा ज्या पद्धतीने तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या काहीवर्षात झाली आहे. ती बघता याआधी क्वचितच कुण्या राजकारण्याची झाली असेल.

तामिळनाडू हे दक्षिण भारतातील लोकसभेच्या 39 जागा असलेले राज्य आहे. आतापर्यंत येथे भाजपला विजय मिळवता आलेला नाही. मात्र, यंदाच्या लोकसभेसाठीच्या एक्झिट पोलमध्ये तामिळनाडूत NDA ला 2 ते 4 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वेळी भाजपने येथे 5 जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र एकही जागा भाजपला जिंकता आली नव्हती. परंतु, यंदा येथे भाजपचे खाते उघडताना दिसत आहे. तामिळनाडूमध्ये 2 ते 4 जागा तर, केरळमध्ये NDA ला 1 ते 3 जागा मिळतील असा अंदाज समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये बांधण्यात आला आहे.

Exit Poll : PM मोदींचं स्वप्न होणार साकार, NDA 400 पार; ‘या’ एकाच एक्झिट पोलचा अंदाज

अन्नामलाईंची जादू कायम

अन्नामलाई कुप्पुस्वामी यांचा जन्म 4 जून 1984 रोजी शेतकरी कुटुंबात झाला. करूर जिल्ह्यात जन्मलेल्या अन्नामलाई यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण केल्यानंतर IIM लखनऊमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षा दिली आणि आयपीएस म्हणून त्यांची निवड झाली. तमिळ, इंग्रजी, कन्नड आणि हिंदी भाषांचे उत्तम ज्ञान असलेल्या अन्नामलाई यांची गणना कुशाग्र पोलीस अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. ज्या भागात ते अधिकारी म्हणून तैनात होते. तेथेही त्यांची आताप्रमाणेच जादू कायम होती.

सरकारी नोकरीला रामराम केला अन् राजकारण उडी घेतली

अन्नामलाई यांनी मे 2019 मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा दिला आणि ऑगस्ट 2020 मध्ये भाजपात प्रवेश करत राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून आजपर्यंत अन्नामलाईंनी मागे बघून बघितलेले नाही. 9 जुलै 2021 रोजी भाजपने अन्नामलाई यांच्या खांद्यावर संपूर्ण राज्याची कमान दिली. त्यानंतर त्यांनी पक्षाची पाळमुळं तळागाळापर्यंत नेली. भाजप घरोघरी नेण्यासाठी अन्नामलाई यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये ‘एन मन, एन मक्कल’ (माय लँड, माय पीपल) यात्रा सुरू केली. या यात्रेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिरवा झेंडा दाखवला तर, याचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) उपस्थितीत झाला होता. अन्नामलाई यांच्या या एका यात्रेने त्यांची पक्षात वेगळी ओळख निर्माण झाली.

Maharashtra Exit Poll : सांगलीत ‘नो मशाल’ ओन्ली ‘विशाल’; मविआत काँग्रेसने केली खेळी

जनतेचे प्रेम अन् मंचावर उपस्थित मोदीही झाले आनंदी

‘एन मन, एन मक्कल’ (माय लँड, माय पीपल) या यात्रेचा समारोप मोदींच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी उपस्थितांनी अन्नामलाई यांचे जोरदार स्वागत केले. नागरिकांचे अन्नामलाई यांच्यावरील जीवापाड प्रेम पाहून खुद्द मोदीही भारावून गेले होते. त्यावेळी मोदींनी त्यांच्या शेजारी बसलेल्या अन्नामलाई यांची पाठ अनेकदा थोपटली होती. मोदींच्या या कौतुकामुळे अन्नामलाई यांच्या ‘एन मन, एन मक्कल’ (माय लँड, माय पीपल) ही यात्रा किती यशस्वी झाली असेल याचा अंदाज बांधता येईल.

अन्नामलाई आज तामिळनाडूतील भाजपचा सर्वात मोठा चेहरा बनले आहेत यात शंका नाही. त्यात आता लोकसभेच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजपनं तामिळनाडूत 2 ते 3 जागांच्या माध्यामातून चंचू प्रवेश केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अन्नामलाई यांचा करिष्मा कामी आल्याचे अधोरेखित झाले असून. हा करिष्मा कायम राहिल्यास भविष्यात तामिळनाडूत भाजप एकहाती सत्तेचे दरवाजे उघडेल असा विश्वास यामुळे निर्माण झाला आहे.

पुन्हा मोदीचं; पण शाह, गडकरींना मोठी लॉटरी, महाराष्ट्रात काय होणार ? ज्योतिष अभ्यासकांचे भाकीत

तामिळनाडूसाठी एक्झिट पोलचे अंदाज काय? 
तामिलानाडू लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवतांना इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 2 ते 4 जागा मिळतील. तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला 33 ते 37 जागा जिंकू शकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय TV9 पोलस्ट्रॅट आणि पीपल्स इनसाइटच्या एक्झिट पोलनुसार तामिळनाडूमध्ये एनडीएला 4 जागांसह लोकप्रिय नेते के. अन्नामलाई निवडणून येतील असे सांगण्यात आले आहे. तर, ABP CVoter च्या एक्झिट पोलनुसार येथे NDA ला 0 ते 2 तर, INDIA आघाडीला 37 ते 39 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज