मोदी-शाहंचे दुसरे फडणवीस! भाजपने तमिळनाडूत मित्राला सोडलं पण ‘के. अन्नामलाई’ म्हणतील तेच केलं!

मोदी-शाहंचे दुसरे फडणवीस! भाजपने तमिळनाडूत मित्राला सोडलं पण ‘के. अन्नामलाई’ म्हणतील तेच केलं!

केंद्रातील सत्ताधारी भाजपपासून (BJP) आणखी एक जुना मित्रपक्ष दुरावला आहे. तमिळनाडूतील अन्ना द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK ) या पक्षाने भाजपशी काडीमोड घेत असल्याची घोषणा केली आहे. भाजपचे प्रदेशाध्याक्ष के. अन्नामलाई (K. Annamalai) यांचा राजीनामा न घेतल्यास साथ सोडण्याची घोषणा अन्ना द्रमुकने केली होती. मात्र भाजपने मित्र पक्षाला अडचण ठरणाऱ्या  चेहऱ्याचा राजीनामा न घेता थेट अन्ना द्रमुकशी पंगा घेतला आणि युती तोडायची असल्यास तोडू शकता असा स्पष्ट संदेश दिला. त्यामुळे भाजपला अन्ना द्रमुकपेक्षा के. अन्नामलाई किती महत्वाचे आहेत हे दिसून आले. K. Annamalai is the reason for the dispute between BJP and AIADMK

के. अन्नामलाई हे भाजपचे आजवरचे सर्वा तरुण प्रदेशाध्यक्ष ठरले आहेत. 2021 पासून त्यांच्याकडे ही जबाबदारी आहे. त्यापूर्वी त्यांचे राजकीय करिअर अवघे 11 महिन्यांचे होते. थोडक्यात सांगायचे तर राजकारणाचा अवघ्या 3 वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तीसाठी भाजपने एका मित्र पक्षालाच गमावले. त्यामुळे अन्नामलाई भाजपसाठी दुसरे देवेंद्र फडणवीस ठरले आहेत. महाराष्ट्रातही यापूर्वी देवेंद्र फडणवीस या चेहऱ्यासाठी 2014 मध्ये युती तोडण्याची घोषणा केली असल्याचे बोलले गेले होते. त्यानंतर 2019 मध्येही फडवणीस यांच्यासाठीच शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास केंद्रातील नेतृत्वाचा विरोध होता, असेही सांगितले जाते.

भाजप आणि अन्ना द्रमुकच्या वादातील कारण ठरले के. अन्नामलाई :

ज्या ताज्या वादामुळे अन्ना द्रमुकने युती तोडण्याची घोषणा केली तो वाद द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या सनातन धर्माविषयीच्या वक्तव्यावरुन होता. स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी सनातन धर्माविषयी एक वक्तव्य केले, जे देशभरात गाजले आणि वादग्रस्त ठरले. त्याचवरुन स्टॅलिन यांच्यावर टीका करताना के. अन्नामलाई यांनी तमिळनाडूचे पहिले मुख्यमंत्री आणि द्रमुकचे दिवगंत नेते यांचा 1956 मधील एका प्रसंगाचे उदाहरण दिले.

1956 मध्ये मदुराई येथे एका कार्यक्रमात अन्नादुराई यांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप अन्नामलाई यांनी केला. ते म्हणाले, अन्नादुराई यांना हिंदु धर्माविषयीच्या त्यांच्या वक्तव्यानंतर मदुराईमध्ये अज्ञातवासात जावे लागले होते आणि माफी मागितल्यानंतरच त्यांना बाहेर पडता आले, असे सांगितले. याच वाक्यानंतर प्रचंड गदारोळ झाला. भाजपने द्रविडी चळवळीचा आणि नेत्याचा अपमान करत असल्याचा आरोप करत अन्ना द्रमुकने के. अन्ना मलाई यांच्या माफीची आणि राजीनाम्याची मागणी केली.

‘हे’ सेव्हन स्टार मोदींनी पुन्हा मध्य प्रदेश मिळवून देणार? सात खासदारांना तिकीट देण्यामागे आहे खास ‘लॉजिक’

मात्र अन्नामलाई यांनी वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला. भाजपही अन्नामलाई यांच्या मागे ठामपणे उभा राहिला. भाजपने त्यांचा राजीनामा घेतला नाही. यामुळे युती तोडली तरी काही हरकत नाही, पण आम्ही आमच्या माणसाच्याच मागे ठामपणे उभा राहणार, असा स्पष्ट संदेश अन्नाद्रमुकला गेला. यावेळी अन्नामलाई यांनी दावा केला की ते अन्नादुराईबद्दल वाईट बोलले नाही आणि फक्त 1956 मधील एका घटनेचा उल्लेख केला होता.

अन्ना मलाई आणि अन्ना द्रमुकमधील हा पहिलाच वाद नव्हता. मागील अनेक दिवसांपासून अन्ना द्रमुकचे नेते के. अन्नामलाई आणि भाजपवर नाराज होते. भाजपचे राज्यातील नेतृत्व काही दिवसांपासून अन्ना द्रमुक पक्षाच्या धोरणांवर टीका करत आहे. शिवाय दिवंगत सी. एन. अन्नादुराई आणि दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची बदनामी करत आहे. या सगळ्यामुळे अन्नामलाई यांच्याशी अन्ना द्रमुकला अडचणी होत्या. अन्ना द्रमुक त्यांना आपला विरोधक मानत होते. आधीचे अध्यक्ष अन्ना द्रमुकशी जुळवून घेत होते, युतीधर्माचे पालन करत होते, असा दावा अन्ना द्रमुकचे नेते करत होते.

अन्नामलाईंची आक्रमक राजकीय शैली अन्ना द्रमुकला ठरली अडचणीची :

अलीकडेच, अन्ना द्रमुकच्या काही वरिष्ठ नेत्यांनी नवी दिल्लीत भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी के. अन्नामलाई यांच्या आक्रमक राजकीय शैलीमुळे निर्माण झालेल्या राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. अन्नामलाई आधीपासूनच युतीच्या बाजूने नाहीत असे अन्ना द्रमुकला वाटत होते. भाजपला सत्तेत आणायचे असल्यास जरी वेळ लागला तरी चालेल पण एकट्याने लढणे कधीही चांगले, असा त्यांचा विश्वास होता. महापालिका निवडणुका एकट्याने लढवण्याच्या मनस्थितीतही ते होते. त्यामुळे त्यांनी राज्यात आक्रमक राजकारणाची शैली स्विकारली

अन्नामलाई यांनी भ्रष्टाचारावरूनही अन्ना द्रमुकवर निशाणा साधला होता. केवळ द्रमुकचेच नाही तर तामिळनाडूतील सर्वांचेच गैरप्रकार उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. अन्नामलाई यांनी अनेक माजी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. अन्ना द्रमुकने हा जयललितांचा अपमान असल्याचे म्हणत अन्नामलाई यांच्या विरोधात प्रस्ताव आणला. अन्नमलाईच्या सततच्या हल्ल्यांमुळे भाजप आणि अण्णाद्रमुकमधील अंतर वाढत गेले.

Manmohan Singh : पटेल यांचा एक नकार अन् देशाच्या राजकारणात झाली डॉ. मनमोहन सिंग यांची एन्ट्री…

अन्नामलाई यांनी एनडीएचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून एडापल्ली के. पलानीस्वामी यांना पाठिंबा देण्यास नकार दिला. अन्ना द्रमुकच्यावतीने ज्येष्ठ नेते सेल्लूर राजू यांनी भाजपने एडापल्ली के. पलानीस्वामी यांना पाठिंबा देण्याबाबत उघडपणे आवाहन केले होते. यानंतर अण्णामलाई यांनी संपूर्ण प्रकरण हायकमांडच्या कानावर घातले. अन्नामलाई यांच्या सातत्याच्या वक्तव्यांना आणि युती विरोधी भूमिकांना वैतागून अन्ना द्रमुकच्या नेत्यांनी नड्डा यांचीही भेट घेतली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडेही कारवाईची मागणी करण्यात आली. मात्र त्यांची एकही मागणी पूर्ण झाली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube