मनस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात! आमचा विरोधच..,; छगन भुजबळांचा आक्रमक पवित्रा
Chagan Bhujbal News : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानूसार शालेय अभ्यासक्रमात मनस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्यात येणार आहेत. एससीईआरटीच्या (SCERTE) या निर्णयाविरोधात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी (Chagan Bhujbal) हाताच्या बाह्याच वर केल्या आहेत. मनस्मृती आमच्या विचारधारेशी विसंगत असून शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आमचा विरोध असल्याचं छगन भुजबळांनी जाहीर केलंय. त्यामुळे आता राज्यात नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे.
पुण्यात चाललय काय? विद्यापिठात सापडला गांजा, प्रशासनात भाजपचे लोक; धंगेकरांचा आरोप
छगन भुजबळ म्हणाले, मनुस्मृती समता परिषदेच्या विचारांशी विसंगत आहे. आमच्या विचारधारेत ती बसत नाही. यामुळे शालेय अभ्यासक्रमात तिचा समावेश करण्यास आमचा ठाम विरोध असेल, असे छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितले आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानूसार आता तिसरीपासून ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार जाहीर करण्यात आलायं. यामध्ये विद्यार्थ्यांनी गीतेमधील अध्याय तसेच मनाचे श्लोक पाठांतर करण्याबाबतची शिफारस करण्यात आलीयं. या धोरणानूसार आता शालेय अभ्यासक्रमात मनस्मृतीचे श्लोक विद्यार्थ्यांना शिकवले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या निर्णयाला विरोधकांकडून कडाडून विरोध केला जात असल्याचं दिसून येत आहे. संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांसारख्या विविध संघटनांकडून हरकती नोंदवल्या जात आहेत.
पटेलांचा राजीनामा, साताऱ्याला मिळणार आणखी एक खासदार; राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर
मनस्मृतीतील श्लोकांच्या मुद्द्यांवरुन राज्यात वातावरण तापलेलं असतानाच आता सत्ताधारी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनीही या निर्णयाला ठामपणे विरोध केला आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यानंतर आणि आलेल्या हरकतींनंतर एससीईआरटी मनस्मृतीच्या श्लोकांबाबत कोणता निर्णय घेईल, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.
भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधताना विधानसभेच्या जागावाटपाच्या मुद्द्यावरही थेट भाष्य केलंय. लोकसभा निवडणुकीत आम्हाला फक्त चारच जागा मिळाल्या आहेत. मात्र विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या आश्वासन मिळणार असल्याचं आश्वासन देण्यात आलंय. त्यामुळे आम्हाला समाधानकारक जागा मिळायला हव्यात, भाजपला जास्त जागा मिळतील हे नैसर्गिक असल्याचंही ते म्हणाले आहेत.