मी फक्त आमदार, उपोषण करायला मोकळा; छगन भुजबळांनी नाराजी बोलून दाखवलीच…

Mla Chagan Bhujbal : पुण्यातील महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Fule) यांच्या वाड्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ आले होते. फुलेवाड्याच्या कामासाठी आंदोलन करावं लागतंय, याबाबत मंत्री पालकमंत्र्यांनाच विचारायला हवं. मी फक्त सरकारमधील घटक पक्षाचा आमदार आहे, त्यामुळे मी उपोषण करायला मोकळा असल्याचं आमदार छगन भुजबळांनी (Chagan Bhujbal) बोलून दाखवलंय. मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळांना स्थान न दिल्याने ते नाराज असल्याचं समोर आलं होतं. याबाबत त्यांनी अधिकृत भाष्य केलं नसून त्यांच्या या विधानावर ते अप्रत्यक्षपणे नाराज असल्याचं दिसून आलंय.
‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’; ‘या’ तारखेला रिलीज होणार मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’
विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळांना डावलण्यात आल्याने भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं. या मुद्द्यावरुन आमदार छगन भुजबळांनी आपली नाराजी उघड-उघड व्यक्त केलीयं. महात्मा फुले वाड्याच्या रखडलेल्या कामाच्या निमित्ताने पुन्हा एकदा छगन भुजबळांनी आपण फक्त आमदार असल्याचं म्हणत अप्रत्यक्ष खंतच व्यक्त केलीयं.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, महात्मा फुले वाडा देशाला अर्पण करण्यात आला. त्याआधीपासून अनेक लोकं या ठिकाणी येतात. या ठिकाणी सभा घेण्यासाठी जागा नाही. अनेक वर्षे जागा मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हे काम 100 ते 200 कोटींचं आहे. अनेक वर्षे प्रयत्न करुनही यश येत असल्याचं पाहायला मिळत नसल्याचं छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय.
फुलेंच्या चित्रपटावर आक्षेप असेल तर पुरावे देऊ – भुजबळ
महात्मा फुले यांच्यावर आधारित हिंदी चित्रपट येत आहे. यावर काहींनी आक्षेप घेतला आहे. महात्मा फुले यांच्याबाबत मराठीमध्ये चित्रपट आले असले तरी पहिला हा हिंदी चित्रपट आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी माझी भेट घेतली त्यावेळेस अनेक पुस्तकाचा विचार करून चित्रपट बनवला आहे, कोणतीही लिबर्टी चित्रपट बनवताना घेतली नाही. एखाद्या गोष्टीबाबत आक्षेप असेल तर आम्ही पुरावे देऊ शकतो, असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत, मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांशी लोकांशी संवाद साधून जागा मोकळी करुन घेणे आवश्यक आहे. इतर ठिकाणी ज्या पद्धतीने जमीन अधिग्रहण केले जाते. या जागांचे अधिग्रहण केले जात नाही. जागा ताब्यात घेण्याचा वेग शून्य आहे. जमीन अधिग्रहणाबाबत पालिका अधिकारी नुसते टोलवाटोलवी करीत आहेत. यामध्ये प्रगती न झाल्यास आंदोलन करण्याची वेळ येणार असल्याचा इशाराही यावेळी भुजबळांनी दिलायं.