दिलासादायक! महात्मा फुले जनआरोग्य योजनेत दंत उपचारांचा समावेश : आरोग्यमंत्री सावंत
MPJAY News : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी (Tanaji Sawant) राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत (MPJAY News) मोठी घोषणा केली आहे. या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून योजनेत आता दंत उपचारांचा समावेश केला जाईल, अशी माहिती मंत्री सावंत यांनी केली. आमदार सत्यजित तांबे यांनी (Satyajeet Tambe) महात्मा फुले जनआरोग्य योजनेत दंत उपचारांचा समावेश करण्याची मागणी केली होती. याबाबत आमदार तांबे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना आरोग्यमंत्री सावंत यांनी या योजनेत (Mahatma Phule Jan Arogya Yojana) दंत उपचारांचा निश्चितच समावेश केला जाईल असे आश्वासन दिले.
तानाजी सावंत सहा हजार कोटींचे लाभार्थी, निवडणूक फंडासाठी कंपन्यांवर मेहरबानी : रोहित पवारांचे आरोप
आरोग्य योजनांचा लाभ घेताना रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तर दुसरीकडे दवाखानेही बोगस रुग्ण दाखवून फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. या प्रकारांना आळा कसा घालणार, गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांवर अजूनही ठोस कारवाई झालेली नाही, राज्य सरकार यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न आमदार सत्यजित तांबे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला होता.
या योजनेत पाच लाखांपर्यंत उपचार मोफत दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. यातील दीड लाख रुपये विमा कंपनी देणार तर साडेतीन लाख रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत. पण, हे साडेतीन लाख रुपये सरकार कसे देणार. शिष्यवृत्ती योजनेत फसवणूक झाली तशी या ही योजनेत होणार का? सर्व रक्कम विमा कंपनीकडून दिली जाणार का? असेही काही प्रश्न उपस्थित तांबे यांनी उपस्थित केले होते.
आमदार तांबे यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना मंत्री तानाजी सावंत म्हणाले, या योजनेत एक हजार रुग्णालयांचा समावेश होता. योजनेत मिळणारा लाभ दीड लाखांवरुन थेट पाच लाख करण्यात आला आहे. या योजनेत ज्या काही अटी होत्या त्या काढून टाकल्या आहेत. या योजनेत आधी 1356 उपचारांचा समावेश होता. आता त्यात डेंटल उपचारांचाही समावेश करण्यात येईल असे आरोग्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.
ठाकरेंना दहा कोटी देऊन ओमराजेंना तिकीट मिळवून दिले; तानाजी सावंतांचा खळबळजनक गौप्यस्फोट
या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणून राज्य सरकारने कोणतेही निर्बंध टाकलेले नाहीत. सर्वांनाच या योजनेतून लाभ मिळत आहे. आता या योजनेच लवकरच दंत उपचारांचाही समावेश करू. आता या योजनेत राज्यातील तेरा कोटी नागरिकांचा समावेश होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचं यावेळी कौतुक करण्यात आलं.