अजितदादांसाठी तटकरे पवारांना भिडले; भर कार्यक्रमात विचारला थेट प्रश्न
Sunil Tatkare : राष्ट्रवादी कॉंग्रेसची (NCP) स्थापन 25 वर्षापूर्वी झाली होती. त्यानंतर अनेकदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सत्तेत राहिला. 2004 साली राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती. मात्र, पक्ष नेतृत्वाने ती संधी घेतली नाही. 20 वर्षापूर्वी राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदाची संधी घेतली असती तर आज पक्षाला पाठीमागे वळून पाहण्याची गरज पडली नसती, असं विधान अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) केलं.
तुम्हाला लवकर पचणी पडणारं नाही; आखाड्यात उतरतं मोहोळांचं सुळेंना जिव्हारी लागणारं प्रत्युत्तर
राष्ट्रवादी पक्षाचा आज 25 वा वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा वर्धापनदिन मुंबईत संपन्न होत आहे. यावेळी तटकरे बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेवर आली तेव्हा अजित पवारांना सात वर्षाचा अनुभव होता. शरद पवार 1972 साली राज्यमंत्री झाले. 1975 मध्येही ते मंत्री झाले. त्यानंतर 1978 ला राज्यात निवडणुका झाल्या आणि वसंतदादांचं सरकार आलं. ते सरकार दोन तीन महिने चाललं. त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री झाले. शरद पवारांनाही सात वर्षाचा अनुभव होता. 2004 साली अजित पवारांनाही सात वर्षाचा अनुभव होता. 2004 ला मुख्यमंत्रीपदाची जी संधी राष्ट्रवादीला आली होती. संधी घेतली असती तर पक्षाला कदी पाठीमागे वळून पाहयाची गरज पडली नसती, असं तटकरे म्हणाले.
तुम्हाला सात वर्षाचा अनुभव होता, तरी तुम्ही मुख्यमंत्री जाा. मग अजितदादांनाही 7 वर्षांचा अनुभव असताना तुम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद का नाकारलं? असा सवाल तटकरे यांनी केला.
भापजने केली नाही तेवढी टीका कॉंग्रेसने केली…
मी 25 वर्षांपासून संघर्ष पाहतोय. स्वाभिमानाच्या मुद्द्यावर लढलो. शिवाय त्या काळात परदेशी नागरिकाचा मुद्दाही होता. राजकारणात अनेकदा भूमिका बदलाव्या लागतात. पक्षाच्या स्थापनेनंतर काही काळानंतर हे आमच्या लक्षात आलं. आम्ही ज्या पक्षापासून फारकत घेतली आणि विधासभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या. त्या पक्षाने म्हणजे कॉंग्रेसने आमच्यावर शिवसेना-भापजने जेवढी टीका केली नसेल तेवढी केली, असंही तटकरे म्हणाले.
2009 मध्ये भाजपसोबत जाण्याचा 16-16 जागांचा फॉर्म्युला ठरला होता, असा दावाही सुनील तटकरे यांनी केला.