कॉंग्रेसची महाराष्ट्रात फरफट, पूर्वी जे महत्व होतं, ते आता…; अशोक चव्हाणांचे टीकास्त्र

कॉंग्रेसची महाराष्ट्रात फरफट, पूर्वी जे महत्व होतं, ते आता…; अशोक चव्हाणांचे टीकास्त्र

Ashok Chavan On Congress : दिल्लीतील रामलीला मैदानावर (Ramlila Ground) आज इंडिया आघाडीची (India Alliance) सभा झाली. या सभेला देशभरातील इंडिया आघाडीचे दिग्गज नेते सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यानंतर भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका केली आहे. काँग्रेसची फरफुट सूर आहे, अशी टीका त्यांनी केली.

साताऱ्यातून कोण लढणार? पृथ्वीराज चव्हाण-जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा

आज माध्यमांशी बोलतांना चव्हाण यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. इंडिया आघाडीकडून झालेल्या टीकेविषयी विचारले असता चव्हाण यांनी कॉंग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले, राज्यातील सध्याच्या नेतृत्वामुळे काँग्रेसची फरफट सुरू आहे. काँग्रेसला पूर्वी जे महत्वं होतं, ते आता राहिलं नाही. काँग्रेसला कोणी विचारायलाही तयार नाही, अशा शब्दात चव्हाण यांनी नाना पटोले यांचे नाव न घेता टीका केली.

Lok Sabha Election: वंचितची अकरा उमेदवारांची दुसरी यादी; सोलापूर, सातारा, माढ्यातही उमेदवार 

पुढं बोलतांना ते म्हणाले की, महाविकास आघाडीत घटक पक्षांचा आदर केला जात नाही. माविआने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान केला नाही. आता तर इतर पक्ष काँग्रेसच्या आधीच लोकसभेसाठी आपापले उमेदवार जाहीर करत आहेत, कॉंग्रेसला मविआतील कुणाही गांभीर्याने घेत नसल्याचं व्हाण म्हणाले.

काल माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरही चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मराठवाडाच नव्हे तर राज्यातील अनेकजण आता काम करत आहे, अनेकांनाचा मोदींवर विश्वास आहे, असं चव्हाण म्हणाले.

सगे सोयरेला आमचाही पाठिंबा
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल अपक्ष उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले. त्यांची ही भूमिका बरोबर असल्याची प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली. चव्हाण म्हणाले की, त्यांची जमेची बाजू ही आहे की, त्यांच्यामागे पक्षाचे कोणतेही लेबल नाही. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. मला राजकारणात यायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहेयांना पाडा असं नेमकं कुणाबद्दल जरांगे बोलले नाहीत. सगे सोयरेला आमचाही पाठिंबा आहे. सरकारने तसं ऑर्डीनंस पास केलं, असंही चव्हाण म्हणाले.

विरोधकांची टीका काय?
अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांची अटक हा संविधानावर आणि लोकशाहीवर झालेला हल्ला आहे.  निवडणुकीत नरेंद्र मोदी मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी घोषणा केली की मी 400 जागा जिंकणार आहे… पण ईव्हीएम, मॅच फिक्सिंग आणि प्रेसचा दबाव असूनही त्यांची संख्या 180 च्या पुढे जाणार नाही, अशी टीका विरोधकांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज