साताऱ्यातून कोण लढणार? पृथ्वीराज चव्हाण-जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा

साताऱ्यातून कोण लढणार? पृथ्वीराज चव्हाण-जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा

Jayant Patil meet Prithviraj Chavan : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाकडे गेली आहे. मात्र, साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांनी (Shrinivasa Patil) निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळं शरद पवार साताऱ्यात कोणाला उमदेवारी देणार याची उत्सुकता सर्वांना लागली. उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करण्याची मविआची रणनीती आहे. त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात आज सविस्तर चर्चा झाली.

Lok Sabha Election: वंचितची अकरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; सोलापूर, सातारा, माढ्यातही उमेदवार 

सातारा आणि सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये खलबतं सुरू झाली. आज जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे तासभर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत सातारा लोकसभेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे. श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्याने पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला लोकसभेसाठी पसंती असल्याचं सुत्रांकडून सांगितले जाते.

कुरबुरी सुरूच! माझा फोटो वापरू नका, अन्यथा…; संजय खोडकेंचा नवनीत राणांना सज्जड दम 

या चर्चेनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. नंतर बोलू अशी मोजकीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे या दोघांमध्ये काय चर्चा? याबाबत तपशील समोर आला नाही. मात्र, चव्हाण आणि पाटील यांच्यातील आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. साताऱ्यातून उमेदवारीबाबत पाटील यांनी चव्हाण यांची भेट घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सागंण्यात येतंय. या बैठकीत चव्हाण यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढवावी, यावर चर्चा झाल्याचे समजते.

श्रीनिवास पाटलांनी माघार घेतल्यानं शरद पवारांनी साताऱ्यात विजयाचा निर्धार केला आहे. त्यांनी शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील हे पर्याय दिलेत. मात्र, तरीही त्यांनी उमेदवारीसाठी पृथ्वीराज चव्हाण यांना प्राधान्यता दिली. कारण, पृथ्वीराज चव्हाण यांची मतदारसंघात स्वच्छ प्रतिमा आहे. याशिवाय स्थानिक पातळीवरही त्यांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असं असलं तरी चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास ते कोणत्या चिन्हावर लढतील, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज