Darshan Thoogudeepa: प्रसिद्ध कन्नड अभिनेत्याला मर्डर केसमध्ये अटक, पोलिसांकडून चौकशी सुरू

Darshan Thoogudeepa: प्रसिद्ध कन्नड अभिनेत्याला मर्डर केसमध्ये अटक, पोलिसांकडून चौकशी सुरू

Darshan Thoogudeepa Detained: प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा (Darshan Thoogudeepa ) याला बेंगळुरू पोलिसांनी हत्येच्या आरोपात ताब्यात घेतले आहे. त्याला पोलिसांनी म्हैसूर येथून ताब्यात घेतले असून आता त्याला बेंगळुरूला आणण्यात आले आहे. (Darshan Thoogudeepa Detained) एका खून प्रकरणात एका आरोपीने दर्शनचे नाव उघड केले असून त्याच्यावर पोलिसांनी (Police) कारवाई केली आहे. दर्शन हा आरोपीच्या सतत संपर्कात होता, असा आरोप आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Darshan Thoogudeepa Shrinivas (@darshanthoogudeepashrinivas)


काय प्रकरण आहे?

TOI च्या रिपोर्टनुसार, बेंगळुरू (Bengaluru) शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा (Darshan Thoogudeepa) आणि त्याच्या नऊ सहकाऱ्यांना एका हत्येप्रकरणी ताब्यात घेतले, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रदुर्गातील रेणुकास्वामी नावाच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. स्वामी हे चित्रदुर्गातील एका मेडिकल दुकानात असिस्टंट होते आणि नुकतेच लग्न झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे प्रथम चित्रदुर्ग येथून अपहरण करून शहराच्या पश्चिम भागातील कामाक्षीपल्य येथे हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह नाल्यातून सापडला असून त्यावर शारिरीक जखमांच्या खुणा होत्या, त्यामुळे हे हत्याकांड असल्याची माहिती समोर आली.

बेंगळुरू पोलिसांनी सांगितले की, “कन्नड अभिनेता दर्शन आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. अद्याप तपास सुरू असल्याने आम्ही जास्त माहिती देऊ शकत नाही,” सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिकच तपास करत आहेत.

दर्शनाचा अनेक वादांशी संबंध राहिला

2011 मध्ये दर्शन खूप वादात सापडले होते, या प्रकरणात त्याच्या पत्नीने त्याला अटक केली होती आणि त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही देण्यात आली होती. 2016 मध्येही दर्शनच्या पत्नीने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. 2021 मध्ये, अभिनेत्यावर म्हैसूरमधील हॉटेलमध्ये मारहाण केल्याचा आरोप होता. 2024 मध्ये त्याची अभिनेत्री पवित्रा गौडासोबतची एक रील व्हायरल झाली.

Mumbai Police : अभिषेक घोसाळकर हत्येनंतर पोलीस अलर्ट; शस्त्र परवान्यांची होणार तपासणी

दर्शन अभिनय कारकीर्द

दर्शन हा कन्नड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेता थुगुदीपा श्रीनिवारस यांचा मुलगा आहे. दर्शनने 1977 मध्ये ‘महाभारत’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. याआधी ते प्रोजेक्शनिस्ट होते. नंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या आणि त्यानंतर त्यांनी मुख्य नायक म्हणून काम केले. मॅजेस्टिक या चित्रपटातून दर्शनला इंडस्ट्रीत ओळख मिळाली.

दर्शनने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. यामध्ये नम्मा प्रितिया रामू, कलासिपल्य, गजा, करिया, नवग्रह, सारथी, बुलबुल या चित्रपटांचा समावेश आहे. क्रांतिवीर सांगोली रायण्णा या चित्रपटासाठी कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कारात त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज